एक्स्प्लोर

पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 

Beed Khasdar : पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आमदारांचा फौजफाटा होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही पंकजाला आघाडी घेता आली नाही. परळीचा अपवाद वगळता पंकजा मुंडे यांना कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही.

Beed Khasdar, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. बीड लोकसभेची लढत अतिशय रोमहर्षक झाली. प्रत्येक फेरीनंतर अन् प्रत्येक तासाला चित्र बदल होते. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय होईल, असा अनेकांचा अंदाज होता. त्याला कारणेही तशीच होती. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आमदारांचा फौजफाटा होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार असतानाही पंकजा मुंडे यांना आघाडी घेता आली नाही. परळीचा अपवाद वगळता पंकजा मुंडे यांना कुठेही मोठी आघाडी घेता आली नाही.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या मागे सहा आमदारांचा फौजफाटा होता. धनंजय मुंडे  यांनी पंकजा मुंडेसाठी जिवाचं रान केले होते, त्यामुळे भाजपला हा विजय सहज मिळेल असं म्हटले जात होते. पण सहा आमदार पाठिशी असतानाही पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशाच झाली. लोकसभेतील पराभवानंतर भाजप अलर्ट मोडवर गेलेय. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर सहा आमदार अलर्ट मोडवर गेल्याची चर्चा आहे. 

बीड लोकसभेत कोण कोणते आमदार पंकजा मुंडेंच्या पाठिशी -

गेवराई - भाजप - लक्ष्मण पवार

माजलगाव - राष्ट्रवादी (अजित पवार)- प्रकाशदादा सोळुंके 

आष्टी - राष्ट्रवादी (अजित पवार)- बाळासाहेब अजबे 

केज - भाजप - नमिता मुंदडा

परळी - राष्ट्रवादी (अजित पवार)- धनंजय मुंडे 

सुरेश धस - विधानपरिषद आमदार 

खासदार कोण कोणते ?

प्रीतम मुंडे - बीड लोकसभा खासदार

भागवत कराड - राज्यसभा खासदार

पंकजा मुंडे यांचं पुढे काय ?

प्रतीम मुंडे यांना नाकारुन भाजपने पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले होते. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे यांना विस्थापित होऊ देणार नाही, असा शब्द पंकजा मुंडे यांनी दिला होता. पण आता पराभव झाल्यामुळे पंकजा मुंडे याच विस्थापित झाल्याच्या चर्चा सुरु आहे. पंकजा मुंडे काय भुमिका घेणार? त्यांचं पुढे काय ? राज्यसभेवर जाणार का ? आमदारकी लढणार का ? यासारखे प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये आहेत.  

केज, गेवराई, अष्टीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का; भाजप आमदारांच्या मतदारसंघातही पिछाडी - 

आष्टी, गेवराई, केज, माजलगाव या मतदारसंघात पंकजा मुंडे यांना मोठा फटका बसलाय. भाजपचे आमदार असतानाही पंकजा मुंडे यांना मोठी आघाडी मिळाली नाही. काही मतदारसंघात आघाडी मिळाली, पण ती नाममात्र..  आष्टीमध्ये नेहमीपेक्षा मिळणाऱ्या मताधिक्यामध्ये घट झाली. आष्टीमध्ये गतवेळपेक्षा निम्मी घट झाली. गेवराईमध्येही आघाडी घेता आली नाही. माजलगावमध्ये फक्त 935 मतांची आघाडी मिळाली. ज्या नेत्यांवर भाजपला आघाडी मिळवण्याचा विश्वास होता, त्या मतदारसंघात साफ निराशा झाली. पंकजा मुंडे यांना फक्त परळीमधून मोठी आघाडी मिळाली. 

पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मते मिळाली ?

परळी विधानसभा मतदारसंघ...

बजरंग सोनवणे - 66940
पंकजा मुंडे  - 141774

गेवराई विधानसभा मतदारसंघ..

बजरंग सोनवणे - 134505
पंकजा मुंडे  - 95409

माजलगाव विधानसभा मतदारसंघ..

बजरंग सोनवणे - 104713
पंकजा मुंडे - 105648

बीड विधानसभा मतदारसंघ..

बजरंग सोनवणे - 139917
पंकजा मुंडे - 77605

आष्टी विधानसभा मतदारसंघ...

बजरंग सोनवणे - 113299
पंकजा मुंडे - 145553

केज विधानसभा मतदारसंघ..

बजरंग सोनवणे - 123158
पंकजा मुंडे - 109360

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget