एक्स्प्लोर

Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा

Vinod Tawde in Virar: विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते.

विरार: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने केला आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर  धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट रोखून धरली आहे. या घटनेनंतर पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

बविआच्या आरोपानुसार, विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती. 

याबाबत बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी 'एबीपी'शी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरु होती. पण मतदानापूर्वी 48 तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, एवढी अक्कल तावडेंना नाही का?  विनोद तावडे यांनी याठिकाणी वाटण्यासाठी पाच कोटी रुपये आणले होते. आता पोलीस याप्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे. सरकार त्यांचंच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले.

 

विनोद तावडेंनी माफी मागण्यासाठी मला फोन केला: हितेंद्र ठाकूर

या घटनेनंतर विनोद तावडे यांनी मला 25 वेळा फोन करुन माफी मागितली, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.  प्रकरण जास्त ताणू नका, असे तावडेंनी सांगितल्याचे ठाकूर यांनी म्हटले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

विवांता हॉटेलमधील बैठकीला भाजपचे उमेदवार राजन नाईकही उपस्थित होते. हॉटेलमध्ये जी पैशांची बंडलं सापडली त्याचा भाजपशी कोणताही संबंध नाही. तुम्ही हॉटेलचे गेट बंद करुन आमच्या कार्यकर्त्यांची तपासणी करा, असे राजन नाईक यांनी म्हटले. विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात काय संवाद झाला, मला माहिती नाही. मी बाजूला होतो, असे राजन नाईक यांनी स्पष्ट केले.

अतुल भातखळकर काय म्हणाले?

पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक असे आरोप करत आहेत, असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. तुम्ही रडीचा डाव खेळू नका, लोकशाही आहे, सामोरे जावा, असं अतुल भातखळकर हितेंद्र ठाकूर यांना म्हणाले.


ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची टीका

या घटनेनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विनोद तावडे आणि भाजपवर प्रचंड आगपाखड केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या. मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी विनोद तावडे यांचा बचाव केला. विनोद तावडे त्याठिकाणी पैसे वाटण्यासाठी गेले नव्हते. विरोधक निवडणूक हारणार असल्यामुळे असले आरोप करत आहेत. पोलिसांना याप्रकरणाची चौकशी करु द्या. त्यानंतर तथ्य बाहेर येईल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.

 

 

आणखी वाचा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदानकार्ड जमा केले, बोटाला शाई लावून 1500 रुपये वाटले; विरोधकांचा आरोप, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडतंय?

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Case: आश्रमशाळेतीळ सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतीळ सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Maharashtra Goverment On Student Protest: महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा; NEET पेपरफुटी प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकाराचा निर्णय
Dharashiv News: नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget