एक्स्प्लोर
Advertisement
मतदारांसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांच्या पायघड्या, पाण्यातून वाट काढणाऱ्या बारामतीतील नव्या पॅटर्नची चर्चा
कांबळेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे शाळा आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. मात्र यावर उपाय करण्यासाठी आणि मतदारांच्या सुविधांसाठी गावातीलच नागरिकांनी अनोखी शक्कल लढवली.
बारामती : मतदान जनजागृती करूनही अनेकजण मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत. मात्र आपल्या मतांचं दान करण्यासाठी अडचणींवर मात करून अनेकांनी मतदानाचा अधिकार बजावल्याचे दिसून आले. यात एका व्हायरल झालेल्या फोटोची खूप चर्चा झाली. तो फोटो होता बारामतीतील कांबळेश्वरच्या मतदान केंद्राचा.
कांबळेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे शाळा आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. मात्र यावर उपाय करण्यासाठी आणि मतदारांच्या सुविधांसाठी गावातीलच नागरिकांनी अनोखी शक्कल लढवली.
ग्रामस्थांनी मतदान केंद्राबाहेर तब्बल सहा ट्रकरच्या ट्रॉल्या एकास एक जोडून सुमारे पन्नास फुट लांबपर्यंत रस्ता तयार केला. हा रस्ता म्हणले मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जणू ट्रॉलीच्या पायघड्या घातल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अनेकांनी याच कौतुक केलं आहे तर अनेकांनी बारामतीत असुविधा असल्याची टीका देखील केली आहे.
राज्यभरात मतदानावर पावसाचं सावट सकाळपासूनच होतं. पुढील 24 तासांत राज्यातील अनेक भागात मोठ्या पावसाचा अंदाज हवामान विभानानं वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. त्यामुळं मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याचं मोठं आव्हान सर्वच राजकीय पक्षाचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसमोर होतं. अनेक ठिकाणी पावसामुळे तारांबळ उडालेली दिसली. मात्र त्यातही मतदानासाठी अनेक शकली लढवून मतदान केल्याचे देखील पाहायला मिळाले.
'या' मंडळींचा आदर्श घ्या; वयाचा, आजाराचा विचार न करता यांनी मतदानाचा हक्क बजावला
सुट्टी असल्याने अनेक जण मतदान करण्याऐवजी घरीच आराम करण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याच बेत आखतात. मात्र मतदान आपलं कर्तव्य आहे, याचा अनेकांना विसर पडतो. मात्र समाजात अशीही काही मंडळी आहेत, ज्यांना कठीण परिस्थितीतही आपल्या कर्तव्याची जाणिव आहे.
नाशिकच्या प्रकाश पवार यांनी सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत पवार यांनी मतदान केलं. प्रकाश पवार हे डायलिसिसचे रुग्ण असून गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर अशोक स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्यांना बाहेर पडू नका, असा सल्ला दिला होता. मात्र पवार यांनी डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्ष करत मतदान केलं आहे. तरुणांपासून सगळ्यांसाठीच हे एक आदर्श आहेत.
याच ठिकाणी नीलिमा लोया या 81 वर्षीय आजींनी बायपासची शस्त्रक्रिया झालेली असताना आपल्या पतीसोबत मतदानाचा हक्क बजावला. या आजींना गुडघे दुखीचाही त्रास आहे. मात्र कसलीही पर्वा न करता त्यांनी आपलं मतदान केलं. याशिवाय त्यांनी तरुणांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे.
शिर्डीतही 106 वर्षीय आजीबाईंनी आपला मतदानाचा हक्क बजावला. छबूबाई भगिरथ कुऱ्हे असं या आजींचं नाव आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील बेलापूर गावात त्यांनी मतदान केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement