एक्स्प्लोर
राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बाळासाहेब थोरात म्हणतात...
राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आणि पक्षाचे प्रमुख नेते आहेत. विखे पाटील नगर आणि शिर्डीत आघाडीसाठी काम करतील अशी अपेक्षा आहे, अशी खोचक टीका थोरात यांनी केली.

अहमदनगर : विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. अहमदनगरमधील सभेत 12 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यावर विखेंचे विरोधक मानले जाणारे बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील पक्षाचे प्रमुख नेते असून ते वेगळं वागतील असं मला वाटत नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आणि पक्षाचे प्रमुख नेते आहेत. विखे पाटील नगर आणि शिर्डीत आघाडीसाठी काम करतील अशी अपेक्षा आहे, अशी खोचक टीका थोरात यांनी केली. प्रसार माध्यमातून विखे पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु असून यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या तरी राज्यातील महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्यानं ते वेगळं वागतील असं मला वाटत नाही, अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाले. सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद आणि मत मतांतरे असतात. मात्र यावेळची निवडणूक विचारधारेची असून आपापसांतील मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सरकार घालविण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे अशी विनंती देखील त्यांनी केली. महाआघाडीला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश? राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. अहमदनगरमधील सभेत 12 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलांच्या प्रवेशानंतर आता हे पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते भाजपच्या गोटात सामील होण्याबाबत चर्चा होत्या. दरम्यान, 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षा' कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा निर्णय घेण्याचं सूतोवाच करत राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. 9 एप्रिल रोजी येत्या 15 दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी गोंधळलेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेक जण गोंधळले आहेत. सुजयच्या तिकिटावरुन निर्माण झालेला गोंधळ थांबवण्याचा मी प्रयत्न केला, मात्र गोंधळ थांबवू शकलो नाही, असे विखे म्हणाले होते. तसेच सुजयचा भाजपात जाण्याचा निर्णय योग्यच होता, त्याला भाजपने सन्मानाने बोलावलं. मुलगा पुढं जातोय याचं समाधान आहे, अशा भावनाही विखे पाटलांनी व्यक्त केल्या होत्या. त्यांनी सुजय विखेंचा प्रचार देखील सुरु केला होता. आता ते स्वत: भाजप प्रवेश करणार असल्याने भाजपची ताकत आणखी वाढणार आहे. राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली होती. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. आता ते अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र




















