Babasaheb Deshmukh: 'हमे पसंद है शांत रहना, मगर इसे हमारी कमजोरी मत समझना..' शेकापच्या बाबासाहेब देशमुखांचा विरोधकांना इशारा, शहाजीबापू पाटलांवरही टीका
Babasaheb Deshmukh : सांगोला नगरपालिकेत झालेल्या पराभवानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात शहाजी बापूंचे नाव न घेता सर्वच विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे.

Solapur Sangola News : सांगोला नगरपालिकेत झालेल्या पराभवानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांनी पक्षाच्या मेळाव्यात शहाजी बापूंचे (Shahajibapu Patil) नाव न घेता सर्वच विरोधकांना गंभीर इशारा दिला आहे. सांगोल्यात (Sangola News) कोणतीही दादागिरी अथवा दोन नंबरचे धंदे चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. शेकापच्या या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा लालबावट्याची ताकद दाखवत मोठं शक्ती प्रदर्शन केलं. या मेळाव्यात पहिल्यांदाच शांत संयमी अशी ओळख असलेले आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे अतिशय आक्रमक झाल्याने कार्यकर्त्यातही मोठा जल्लोष पाहायला मिळाला. तर 'हमे पसंत है शांत रहना, मगर इसे हमारी कमजोरी मत समझना..' असे म्हणत शेकाप आमदार देशमुख यांनी विरोधकांनाही स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. (Shahajibapu Patil vs Babasaheb Deshmukh)
Babasaheb Deshmukh : मी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा नातू आहे, हे ध्यानात ठेवा
गेल्या काही दिवसात आमदार देशमुख यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका सुरू होती त्यालाही आज आमदार देशमुख यांनी उत्तर देताना तुम्हाला जी टीका करायचे माझ्यावर करा, मात्र माझ्या कुटुंबातील आई-वडील, आजी, बहीण, पत्नी यावर जर कोणी बदनामीकारक टीका केल्यास बाबासाहेब देशमुख खपवून घेणार नाही, असा सज्जड दम देखील त्यांनी दिलाय. एखाद्या शेकाप कार्यकर्त्यावर जर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास मी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचा नातू आहे, हे ध्यानात ठेवा. असे सांगताना सांगोल्यात कोणतीही दादागिरी खपवली जाणार नाही, असा इशाराही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे.
Babasaheb Deshmukh : सांगोल्या दादागिरी किंवा बेकायदेशीर उद्योग चालणार नाहीत
शहाजी बापू पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर जोरदार शब्दात प्रहार करताना, विधानसभेत पराभव झाल्यानंतर विरोधकांना पराभव पचवता आला नाही. यानंतर त्यांनी सांगोला शांत झाला, अशा पद्धतीचे स्टेटस ठेवले होते. मात्र सांगोला आता शांतच राहणार आहे. कोणाला वाटत असेल आपली दादागिरी चालेल किंवा आपले दोन नंबरचे धंदे चालतील, तर भादराव हा बाबासाहेब देशमुख आहे, हे ध्यानात ठेवा. येथे पूर्वी सुरू असलेले सर्व दोन नंबरचे धंदे बंद केले आहेत. अजूनही कोणी चोरून हे धंदे करत आहेत आणि त्याला प्रशासनाची साथ आहे तेही आता पूर्णपणे बंद होतील, असा इशारा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी बापू पाटील यांचे नाव न घेता दिला आहे.
आमदार देशमुख यांचे चुलत बंधू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचेही नाव न घेता टीका करताना काही मंडळी विरोधकांशी हात मिळवणे करत काही चोरून बैठका घेत असतील किंवा कोणाला फूस लावून उद्योग करत असतील तर बाबासाहेब देशमुख हे मोडून काढायला एकटा खंबीर आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















