एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या नेत्यांचं भविष्य काय? ज्योतिष परिषदेच्या अध्यक्षांचे अंदाज
"नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, परंतु त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही". असे भाकित महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक : "नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, परंतु त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही". असे भाकित महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केले आहे. आज नाशिकमध्ये ज्योतिषांची परिषद सुरु आहे. या परिषदेमध्ये ज्योतिषांकडून विविध भाकितं व्यक्त करण्यात आली आहेत.
मारटकर यांनी सांगितले की, "बहुमत मिळणार नसलं तरी मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून येतील. महाराष्ट्राबात मारटकर म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या जागा कमी होणार आहेत."
मारटकर म्हणाले की, "मोदींची रास वृश्चिक आहे. सध्या गुरुचं भ्रमण त्यांच्या राशीतून सुरु आहे आणि हेच त्यांना सत्ता मिळवण्यासाठी पूरक ठरणार आहे."
ज्योतिषांची भाकितं
राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राशीत रवी आणि मंगळाची स्थिती ही काही प्रमाणात राहुल गांधी यांच्यासारखीच आहे. राज ठाकरे यांना विधानसभेत मोठं यश मिळणार आहे. राज यांचा प्रभाव वाढून शिवसेना-भाजपला त्याचा मोठा फटका बसेल.
शरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रिका खूप चांगली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होईल.
राहुल गांधी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पंतप्रधान होण्यासाठी सध्याची परिस्थिती चांगली नाही. त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागणार आहे. येणाऱ्या काळात त्यांचे भविष्य चांगलं आहे.
व्हिडीओ पाहा
प्रियांका गांधी : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना भविष्यात मोठी संधी मिळू शकते.
सुजय विखे-पाटील : अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे यांचा एकतर्फी विजय जवळपास निश्चित आहे
पार्थ पवार : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा या निवडणुकीत खूप कमी मतांनी पराभव होणार आहे. त्यांची पत्रिका चांगली आहे. श्रीरंग बारणे यांना पवार जोरदार टक्कर देतील.
समीर भुजबळ : नाशिकमध्ये समीर भुजबळ यांची ताकद वाढली आहे, नाशिकमध्ये कोण जिंकणार हे सांगणं कठीण आहे. जो कोणी उमेदवार नाशिकमध्ये निवडून येईल, तो फार कमी मतांच्या फरकाने विजयी होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
विश्व
Advertisement