एक्स्प्लोर
Advertisement
सदस्यत्वाचा फॉर्म भरुन नितेश राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, नारायण राणेंबाबत सस्पेन्स कायम
नितेश राणेंचा प्रवेश जरी झाला असला तरी नारायण राणेंचा भाजपप्रवेश कधी होणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून रखडलेला नितेश राणेंचा भाजप प्रवेश कुठलाही गाजावाजा न करता पार पडला. नितेश राणे आज (3 ऑक्टोबर) कणकवलीच्या भाजप कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा नोंदणी अर्ज भरला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याशिवाय दुसरा कोणताही मोठा नेता यावेळी उपस्थितीत नव्हता.
नितेश राणे यांनी 1 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात विरोध होता. हा विरोध लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर नितेश राणे यांचा आज अखेर भाजपात प्रवेश झाला आहे. नितेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
भाजपच्या तिसऱ्या यादीत नितेश राणे यांचं नाव येण्याची शक्यता असून, उद्या (4 ऑक्टोबर) कणकवलीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान नितेश राणेंचा प्रवेश जरी झाला असला तरी नारायण राणेंचा भाजपप्रवेश कधी होणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.
राणे विरोधकांची एकत्रित मूठ
नितेश राणे यांना भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारी मिळाली असली तरी आज पूर्वाश्रमीचे राणेंचे सहकारी संदेश पारकर राणेंच्या आधीच भाजपवासी झाले होते. मात्र नितेश राणे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे संदेश पारकर आता नितेश राणेंविरोधात उमेदवारी अर्ज भरला आहे. दुसरीकडे अलिकडे राणेंना सोडून गेलेले सतीश सावंत हे देखील नितेश राणे विरोधकांची एकत्रित मूठ बांधून त्यांच्याविरोधात उभे राहतील अशी चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement