एक्स्प्लोर

Chopda Vidhan Sabha Result 2024: चोपड्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला जनतेचा कौल, ठाकरे गटाला हार, रंगतदार लढत

Chopda Vidhan Sabha Constituency: चोपडा विधानसभेच्या जागेवर लोकांनी बराच काळ काँग्रेसला निवडून दिले आहे. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादीने काबीज केली होती.

Chopda Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024)  निकालाची रणधुमाळी पाहायला मिळतेय. यंदा संपूर्ण राज्यात एकाच वेळी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात निवडणुकीचे रंग दिसून येत आहे, त्यापैकी चोपडा विधानसभा मतदारसंघाची (Chopda Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. महाराष्ट्रातील चोपडा विधानसभा जागा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 10 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे विजयी झालेत. तर ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांना हार स्वीकारावी लागलीय. यंदा या निवडणूकीची रंजक झलक पाहायला मिळाली

जनतेचा कौल शिंदे गटाच्या शिवसेनेला

चोपडा विधानसभा मतदारसंघ - चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे (Chandrakant Soanwane) यांच्या विरुद्ध शिवसेनेचे (उबाठा) प्रभाकर सोनवणे (Prabhakar Sonawane) यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. मात्र यंदा जनतेचा कैल शिंदे गटाला मिळालाय. चोपडा विधानसभेच्या जागेवर लोकांनी बराच काळ काँग्रेसला निवडून दिले आहे. एकदा अपक्ष उमेदवाराचा आणि एकदा जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय वगळता 1995 पर्यंत येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर ही जागा राष्ट्रवादीने काबीज केली. यानंतर या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत होती. मात्र, गेल्या दोन निवडणुकांपासून येथे शिवसेनेचेच उमेदवार विजयी होत आहेत.

2019 च्या निवडणुकीत काय झाले?

2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर चोपडा येथे शिवसेनेकडून लताबाई चंद्रकांत सोनवणे या रिंगणात होत्या, त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून जगदीशचंद्र रमेश वळवी रिंगणात होते. याशिवाय या जागेवरून प्रभाकर सोनवणे आणि डॉ. चंद्रकांत बरेला या दोन अपक्षांचेही अर्ज दाखल झाले होते. या निवडणुकीत लताबाईंना 78,137 मते मिळाली. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना एकूण 57,608 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार प्रभाकरप्पा यांना 32,459 मतांवर तर डॉ. चंद्रकांत बरेला यांना 17,085 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत लताबाईंनी 20,529 मतांनी दणदणीत विजय नोंदवला.

मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?

महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.

हेही वाचा>

Erandol Vidhan Sabha Constituency: एरंडोलमध्ये 'पाटलांची' जादू , चुरशीची लढत! कोणी उधळला विजयाचा गुलाल?

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Embed widget