एक्स्प्लोर

शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात...

कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण ही माझी संस्कृती नसल्याचं मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. त्यातच ही निवडणूक कुणा व्यक्तीची राहिली नसून जनतेची झाली आहे. कारण गेल्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, असे ते म्हणाले.

शिरुर : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. या यादीत मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. VIDEO | शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात...| मुंबई | एबीपी माझा शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला संधी दिली. त्याबद्दल मी पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी दिली आहे. मला उमेदवारी जाहीर झाल्याने निवडणूक सोपी झाली असं म्हणणाऱ्याचा यावेळी  कोल्हे यांनी समाचार घेतला. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण ही माझी संस्कृती नसल्याचं मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. त्यातच ही निवडणूक कुणा व्यक्तीची राहिली नसून जनतेची झाली आहे. कारण गेल्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे, असे ते म्हणाले. तासनतास वाहतूक कोंडी, बैलगाडी शर्यतीवरील न हटलेली बंदी, शेत मालाचे कोसळलेले दर, शिवनेरी आणि वडू तुळापूर येथील ऐतिहासिक ठेव्याचा रखडलेला विकास असे अनेक घेऊन ही जनताच निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यातच मला सेलिब्रिटी उमेदवार म्हटलं जातंय, पण सुज्ञ जनताच ठरवेल त्यांचा खासदार कोण आणि कसा असला पाहिजे ते येत्या काळात ही निवडणूक कोणत्या अंगाला जाईल हे स्पष्ट होईलच. माझा मतदार राजावर पूर्ण विश्वास आहे. ते मला दिल्ली दरबारी पाठवतील आणि मी त्यांच्या समस्या प्रभावीपणे संसदेत मांडेन आणि ते कसोशीने सोडवण्यास कटिबद्ध राहीन, असे ते म्हणाले. मावळची उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ आणि रोहित पवार म्हणतात... लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. या यादीत मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवारांनी पक्षाचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. तर त्यांचे बंधू रोहित पवार यांनी पार्थ पवार नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे म्हटले आहे.  VIDEO | पार्थ पवार मावळमधून तर शिरुरमधून अमोल कोल्हेंना संधी | मुंबई | एबीपी माझा पक्षनेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कार्याची सुरुवात करत आहे. आशाताई पवार आणि अनंतराव पवार यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. साहेबांच्या,दादांच्या आणि सुप्रिया ताईंच्या नेतृत्वाखाली करण्याचे भाग्य मला मिळत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनातील वाटचालीत मी यशस्वी होईल, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता मला माझ्या कामासाठी आणखी ऊर्जा मिळत आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने व आशीर्वादाने मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकणार, यावर माझा विश्वास आहे. मावळचा दूरगामी विचार आणि शाश्वत विकास करणे, तिथल्या स्थानिकांना न्याय मिळवून देणे, त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देणे हे विषय माझ्यासाठी प्राधान्याचे राहतील. माझ्या देश बांधवांच्या समस्यांकडे लक्ष देऊन संसदेत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्की सार्थ ठरवेल, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात... तर रोहित पवार यांनी बंधू पार्थ पवार यांची मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्यात आल्याचा विशेष आनंद आहे. पार्थ पवार नक्कीच मोठ्या मताधिक्याने निवडून येतीलच, सोबत मावळ परिसरात विकासकांमांना नवी दिशा देखील मिळेल, असे म्हटले आहे.   लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये कॉंग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून माढासाठी नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असे  जयंत पाटील यांनी सांगितले. एकूण पाचजणांची नावे दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. माढा आणि नगरच्या उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. बीडमधून घोषित झालेल्या बजरंग सोनावणे यांच्या नावावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. काल लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली होती.  ही पहिली यादी असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी काल सांगितले होते. त्यानुसार आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
 शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात...
14 मार्च रोजी पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर, बीड, गोंदिया येथील उमेदवारांची घोषणा  झालेली नव्हती. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले आहे, त्यावर चर्चा सुरु असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1  अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीने बुलडाणा लोकसभेतून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने सोडली असली तरी स्वाभिमानी अजून 2 जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तोडगा कसा काढणार याकडे आता लक्ष लागून आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ ईशान्य मुंबई  - संजय दीना पाटील बारामती - सुप्रिया सुळे बुलडाणा - राजेंद्र शिंगणे सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले कोल्हापूर - धनंजय महाडिक जळगाव - गुलाबराव देवकर रायगड- सुनील तटकरे ठाणे - आनंद परांजपे परभणी -  राजेश विटेकर कल्याण - बाबाजी पाटील लक्षद्वीप - मोहम्मद फैजल हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरुरमधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनावणे, दिंडोरीमधून धनराज महाले यांची नावे जाहीर झाली आहेत. लोकसभेची आणखी काही उमेदवारांची यादी शिल्लक आहे. त्यामध्ये कॉंग्रेस पक्षासोबत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकत्रित नावे जाहीर केली जातील असेही प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सांगितले. पवार साहेबांनी माढा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांशी सल्लामसलत करून माढासाठी नाव जाहीर केले जाईल असे सांगतानाच एक दोन दिवसात इतर नावांची यादीही जाहीर केली जाईल असे  जयंत पाटील यांनी सांगितले. एकूण पाचजणांची नावे दुसऱ्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. माढा आणि नगरच्या उमेदवारांची नावे मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. बीडमधून घोषित झालेल्या बजरंग सोनावणे यांच्या नावावरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा होती. काल लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर झाली होती.  ही पहिली यादी असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी काल सांगितले होते. त्यानुसार आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली.
 शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात...
काल पत्रकार परिषदेत मावळ, माढा, अहमदनगर, बीड, गोंदिया येथील उमेदवारांची घोषणा  झालेली नव्हती. काही जागा काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याचे चालले आहे, त्यावर चर्चा सुरु असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1  अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीने बुलडाणा लोकसभेतून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा केली आहे. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून आग्रही आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीने सोडली असली तरी स्वाभिमानी अजून 2 जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे यावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तोडगा कसा काढणार याकडे आता लक्ष लागून आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ ईशान्य मुंबई  - संजय दीना पाटील बारामती - सुप्रिया सुळे बुलडाणा - राजेंद्र शिंगणे सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले कोल्हापूर - धनंजय महाडिक जळगाव - गुलाबराव देवकर रायगड- सुनील तटकरे ठाणे - आनंद परांजपे परभणी -  राजेश विटेकर कल्याण - बाबाजी पाटील लक्षद्वीप - मोहम्मद फैजल हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादीही नुकतीच जाहीर झाली आहे. 21 उमेदवारांच्या या यादीत महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाचीही घोषणा झाली. या दुसऱ्या यादीत उर्वरित सर्व 16 जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. यामध्ये नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध पटोले अशी लढत रंगणार आहे. दरम्यान दुसऱ्या यादीतही प्रियांका गांधी यांचं नाव आलेलं नाही. काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांच्या यादीत नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा, गडचिरोली-चिमूर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना काल उमेदवारी जाहीर केली. शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात... उत्तर प्रदेशातील असून यामध्ये नगिना येथून ओमवती देवी जटाव, मोरादाबाद येथून राज बब्बर, खेरीतून जाफर अली नक्वी, सितापूरमधून कैसर जहाँ, मिसरिख येथून मंजरी राही, मोहनलाल गंज येथून रामशंकर भार्गव, सुल्तानपूर येथून डॉ. संजय सिंह, प्रतापगढ येथून रत्ना सिंह, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल, फतेहपूर येथून राकेश सचन, बहारिचमधून सावित्रीबाई फुले, संत कबीर नगर येथून परवेझ खान, बंसगाव येथून कुश सौरभ, लालगंजमधून पंकज मोहन सोनकर, मिर्झापूर येथून ललितेश त्रिपाठी आणि रॉबर्ट्सगंज येथून भगवती प्रसाद चौधरी या उमेदवारांची नावे काल जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने 7 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती.  यात 15 उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या होत्या.  पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. VIDEO : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार पहिल्या यादीत काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या 15 जागांपैकी 11 जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील होत्या. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून नशीब आजमावणार आहेत. शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात... राहुल गांधी अमेठीतून, सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा झाली असली तरी प्रियांका गांधी यांचं नाव तूर्तास यादीत आलेलं नाही. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशानंतर सोनिया लोकसभा लढणार की नाही याबद्दल साशंकता होती, मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget