Mahesh Sawant: लोकं माझा विजय खेचून आणणार, महेश सावंत यांचा शड्डू; उद्धव ठाकरेंचा माहीममधील शिलेदार म्हणाला...
Mahesh Sawant On Amit Thackeray: माझा नक्की विजय होणार, असा दावा ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केला आहे.
Mahesh Sawant On Amit Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढणार आहे. अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे माहीम विधानसभेतून उमेदवार देणार नाहीत, अशी चर्चा रंगली होती. परंतु अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी देखील माहीम विधानसभेतून महेश सावंत यांना उमेदवारी दिली. आज महेश सावंत यांन एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी माझा नक्की विजय होणार, असा दावा महेश सावंत यांनी केला आहे.
मी आव्हान पैलवतच नाही. राज ठाकरे मोठे माणूस आहेत. मी सर्वसामान्य माणूस आहे. मी तुम्हाला कधीही भेटू शकतो. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री बारा-एकवाजेपर्यंत...दादर-माहीममध्ये पाण्याचा प्रश्न मोठा आहे. पाण्याचा दाब कमी आहे, तो प्रश्न मी सोडवणार, असं महेश सावंत यांनी सांगितले. तसेच जे या मतदारसंघाच्या बाहेर गेले आहेत. त्यांना मी माझ्या मतदारसंघात परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. एसआरएच्या योजना आहेत, त्या मी पुन्हा सुरु करणार असंही महेश सावंत म्हणाले. छत्रपती शिवाजी पार्कमधील धुळीचा प्रश्नही मी सोडवणार आहे. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी जाहीर पाठिंबा मागितला नव्हता. दाखवण्याचे दात वेगळे असतात. त्यांच्याकडे उमेदवार नाहीय. उमेदवार आयात करावा लागतोय. 100% माझा विजय आहे. लोकं माझा विजय खेचून आणणार आहे. मी जास्तीत जास्त मतांनी निवडून येणार, असा दावाही महेश सावंत यांनी यावेळी केला.
मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस?- राज ठाकरे
एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यापासून पाठिंबाबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला, पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावं, मी सुद्धा लढेन...मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस, तो म्हणाला पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावे , मी सुद्धा लढेन, असं अमित म्हणाला. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो. अमितने ठरवले आहे, आज उभा केलं नाही, तर उद्या निवडणुकीत उभा करावाचं लागेल, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच अमितप्रमाणे अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह इतर उमेदवार देखील माझ्यासाठी समान आहे, त्यांच्यासाठी देखील मी प्रयत्न करणार, असं राज ठाकरे म्हणाले.