एक्स्प्लोर
Advertisement
लोकसभेत युतीसाठी मातोश्रीची पायरी चढणारे अमित शाह आगामी विधानसभेत युतीच्या चर्चेत मध्यस्थी करणार का?
सध्याची पक्षाची मजबूत स्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री पदावर असलेले अमित शाह आज युतीच्या चर्चेसाठी मध्यस्थी करण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपाच्या चर्चेत मध्यस्थी करुन युतीवर शिक्कामोर्तब करतील का याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागेलेली आहे. मात्र साध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार अशी भेट होण्याची शक्यता फारच धूसर आहे.
लोकसभा निवडणुकीआधी तीन राज्याच्या विधानसभेचे निकाल भाजपसाठी प्रतिकूल होते. त्यामुळे एनडीएच्या सर्वात मोठ्या घटक पक्ष शिवसेनेला सोबत ठेवणं ही भाजपची लोकसभेसाठी प्राथमिकता होती. मात्र शिवसेना संधीचा फायदा करुन घेण्यासाठी सवयी आणि सोयीनुसार आक्रमक झाली होती.
अर्थात त्यावेळी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीची पायरी ओलांडून थेट उद्धव ठाकरेंना युतीसाठी साकडं घातलं होतं. तब्बल साडे तीन तास चाललेल्या या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करुनच अमित शाह बाहेर पडले. इतकंच काय तर लोकसभेत शिवसेनेचे सगळे हट्ट पुरवत भाजपच्या कोट्यातील पालघरसारखी जागा भाजपने शिवसेनेला उमेदवारासकट देऊ केली. साताऱ्यात लढण्यासाठी उमेदवारच नाही तर रसद ही पुरवली. सर्वात महत्वाचं म्हणजे सेनेच्या विरोधामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारलं. तसेच लोकसभेच्या जागावाटपात भाजपने शिवसेनेला एक जागा जास्त सोडली आणि युतीची घोषणा करुन टाकली. त्यासोबतच विधानसभेत समसमान जागावाटपाची ग्वाही देत आमचं ठरलंय अशी घोषणा केली.
Diwakar Raote | 144 जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना नेते दिवाकर रावतेंची 'तोंडी परीक्षा' | ABP Majha
मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला अनपेक्षीत असं अभूतपूर्व यश मिळालं. 2014 च्या मोदी लाटेचं रुपांतरण त्सुनामीत झालं आणि भाजपचा आत्मविश्वास पुन्हा बळावला. आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत युतीची गरज जितकी भाजपला आहे तितकीच किंबुहना त्याहून जास्त शिवसेनेला आहे.
त्यामुळे विधानसभेचा 50-50 फॉर्म्युला भाजपला आता व्यवहार्य वाटत नाहीये. भाजपकडून 288 जागांची तयारी पूर्ण झालेली असून नैतिकतेच्या आधारावर सेनेसोबतची युती गरजेची आहे. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून युतीबाबतचे सर्व अधिकार राज्याच्या नेत्यांना दिलेले आहेत. राज्यातील नेत्यांचा जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी सतत संवाद सुरु असून चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचा दावा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून केला जातोय. यासाठी सध्याच्या परिस्थितीत अमित शाह यांनी या चर्चेत सहभागी होणं अपेक्षित नाही.
Uddhav Thackeray | युतीचा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरला आहे , उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद | ABP Majha
कालच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागू झालीय. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री या नात्याने अमित शाह यांचा मुंबई दौरा पक्षासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय. 370 कलमासंदर्भात भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन हाच निवडणुकांचा प्रमुख मुद्दा असणार हे स्पष्ट होतंय. यामुळे आजच्या अमित शाह यांच्या दौऱ्याचा कॅनव्हस अतिशय मोठा आहे.
त्यामुळे लोकसभेला मातोश्रीवर जाऊन मोदींच्या विजयासाठी राष्टीय अध्यक्ष अमित शाह यांनी वाटाघाटी केली होती. मात्र सध्याची पक्षाची मजबूत स्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री पदावर असलेले अमित शाह आज युतीच्या चर्चेसाठी मध्यस्थी करण्याची शक्यता कमी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement