Akhilesh Yadav : उत्तर प्रदेशात किती जागा जिंकणार? अखिलेश यादव यांनी खरगेंसमोर थेट आकडा सांगितला, म्हणाले...
Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
लखनौ : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखनौमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी 79 जागांवर विजय मिळवेल असं म्हटलं. तर, मल्लिकार्जून खरगे यांनी देशातील चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. देशातील स्थिती पाहून आम्ही सांगू शकतो की 4 जूनला देशात इंडिया आघाडीचं नवं सरकार स्थापन होतंय, असं खरगे म्हणाले.
अखिलेश यादव काय म्हणाले?
अखिलेश यादव यांनी माध्यमांना 4 जूनपासून सुरु होणाऱ्या सुवर्णकाळासाठी शुभेच्छा देतो, असं म्हटलं. इंडिया आघाडी उत्तर प्रदेशात 79 जागा जिंकणार असल्याचं अखिलेश यादव म्हणाले.
INDIA bloc will win 79 seats in UP, it is in contest only on just one seat: SP chief Akhilesh Yadav in Lucknow
— Press Trust of India (@PTI_News) May 15, 2024
मल्लिकार्जून खरगे काय म्हणाले?
2024 ची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. खरगे म्हणाले, एका बाजूला गरिबांच्या बाजूनं लढणारे पक्ष आहेत. तर, दुसऱ्या बाजूनं श्रीमतांच्या बाजूनं, धर्माच्या आधारावर लढणारे लोक आहेत, असं खरगे म्हणाले.
आमची लढाई गरिबांच्या बाजूची आहे. ज्यांना एका वेळेचं जेवण मिळत नाही, नोकरी मिळत नाही, असं खरगे म्हणाले. डिग्री डिप्लोमा होऊन देखील डिग्री मिळत नाहीत, सरकारमध्ये विविध पदं रिक्त असून देखील केंद्र सरकारकडून पदं भरली जात नाहीत, असं खरगे म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष खरगे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भाजप पिछाडीवर असून इंडिया आघाडी पुढे आहे, असं रिपोर्टस आमच्याकडे आले आहेत. भाजपचे नेते संविधान बदलण्याबाबत वक्तव्य करतात. मात्र, नरेंद्र मोदी त्यावर काही करत नाहीत, अशी वक्तव्य करणाऱ्यांना पक्षाबाहेर का काढलं जात नाही, असा सवाल मल्लिकार्जून खरगे यांनी केला. मल्लिकार्जून खरगे यांनी जातनिहाय जनगणना करणार असल्याचं देखील म्हटलं.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपनं 62 जागा जिंकल्या होत्या. तर, बसपानं 10 आणि समाजवादी पार्टीनं 5 जागांवर विजय मिळवला होता. अपना दल सोनेलाल पक्षानं दोन आणि काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला होता.
संबंधित बातम्या :
मोदीजी म्हणाले, तुमचा आवाज बसणार, गुळण्या करा; पंतप्रधानांच्या आपुलकीने मुख्यमंत्री शिंदे भारावले