एक्स्प्लोर

Ajit Pawar: बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्रीपद द्या; मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अजितदादांचा अमित शाहांसमोर प्रस्ताव?

Amit Shah in Mumbai: अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 7 महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. महायुतीमधील वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका, असे शाहांनी सांगितल्याचे समजते.

मुंबई: महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सोमवारी मुंबई विमानतळावर छोटेखानी बैठक पार पडली होती. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर बोलून दाखवल्याचे समजते. अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे, असे अमित शाह यांना सांगितले.  विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

 राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे नुकतेच मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शाह यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. तसेच शाहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आशिष शेलार यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठीही गेले होते. तत्पूर्वी रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. 

याशिवाय, भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी पडद्यामागे जोरदार तयारी सुरु असल्याचेही समोर आले आहे. भाजपचे 50 टक्के उमेदवार निश्चित झाल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबाबत काय ठरलं?

अजितदादा गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजितदादा गटाला 70 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. अमित शाह यांच्यासोबत मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत विधानसभेच्या 40 जागांबाबत चर्चा झाली. या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय, आम्हाला मविआच्या काळातील राजकीय समीकरणानुसार काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागा हव्या असल्याचेही अजितदादा गटातील नेत्याने सांगितले.

आणखी वाचा

अजितदादा आमचे कॅप्टन, त्यांनी शस्त्र खाली ठेवणं योग्य नाही; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्तLalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्हPune Kasba Ganpati Visarjan LIVE : पुण्यात मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूकBhausaheb Rangari Ganpati : भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर शंख पथकाचा शंखनाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी डॉल्बी साऊंड लावताना मेंदुतून रक्तस्राव, डीजेवाला जागीच कोसळला अन्...
Lalbaugcha Raja: लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
लालबागचा राजाच्या चरणांपाशीची ती चिठ्ठी चर्चेत, सुधीर साळवींना ठाकरे गटाची उमेदवारी, अजय चौधरींचा पत्ता कट होणार?
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Lalbughcha Raja Visarjan Aarti LIVE : सुखकर्ता दुःखहर्ता ... विसर्जनाआधी लालबाग राजाची आरती लाईव्ह
Delhi Chief Minister दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी यांना संधी; केजरीवालांकडून प्रस्ताव, भाजपचा दावा ठरला खोटा
Sherlyn Chopra Shocking Confession :   होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
होय, पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केलाय; अभिनेत्रीच्या कबुलीने उडाली एकच खळबळ
Bhavana Gawali : मंडप टाकता तर खुर्च्या ठेवायला काय अडचण? भावना गवळी पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?
मंडप टाकता तर खुर्च्या ठेवायला काय अडचण? भावना गवळी पोलिसांवर संतापल्या, नेमकं काय घडलं?
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Bigg Boss Marathi Season 5 : अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
अभिजीत अन् पॅडीदादामध्ये रंगली चर्चा, ''अरबाज म्हणजे गुहेत पळून जाणारा सिंह!''; संग्रामचाही टोला
Embed widget