एक्स्प्लोर

अजितदादा आमचे कॅप्टन, त्यांनी शस्त्र खाली ठेवणं योग्य नाही; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal on Ajit Pawar : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले होते.

नाशिक : बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून (Baramati) निवडणूक लढणार नसल्याचं संकेत त्यांनी दिले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते (NCP Ajit Pawar Group) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे. 

अजित पवार यांनी या आधीही ते बारामतीमधून निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) लढणार नाही, असे संकेत दिले होते. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी तशाच प्रकारचं वक्तव्य केल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे अजित पवार भावनिक राजकारण करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. आता याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी अजितदादा आमचे कॅप्टन आहेत. ते बारामतीतूनच निवडणूक लढतील, असे वक्तव्य केले आहे. 

अजितदादांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही

छगन भुजबळ यांनी आज येवला येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अजित पवार आमचे कॅप्टन आहे. त्यांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही. ते बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे. 

राज्यपालांच्या दौऱ्याकडे छगन भुजबळांची पाठ

दरम्यान, राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. राज्यपालांनी स्वतः लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्याकडून विकासकामे, योजनांची अंमलबजावणी यांसह विविध समस्यांबाबत आढावा घेतला. मात्र राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळांनी पाठ फिरवली. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की,  मला राज्यपालांच्या दौऱ्याची आधी कल्पना नव्हती. माझ्या मतदारसंघात काही विकासकामांचे उद्घाटन बाकी आहे. आचारसंहिता लागू होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे उद्घाटन करण्यासाठी मी मतदारसंघात जात आहे. पण राज्यपाल यांच्याबाबत आदर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळ यांचे सूतोवाच

'शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar Letter : कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, पत्रातून शरद पवारांवर निशाणाMumbaicha Raja Mirvanuk : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवातMumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवातManoj Jarange Jalna : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आजपासून सुरूवात

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
बाप्पा निघाले गावाला... नाशकात विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार, दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
Vidhansabha Election 2024: विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
विधानसभेला भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या, विनिंग मेरिटवर ए,बी,सी कॅटेगरीत विभागणी, 2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मंडपात आवराआवर सुरु असताना अनंत अंबानी दर्शनाला पोहोचतात तेव्हा...
बाप्पा चालले गावाला! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ
Baramati Anonymous Letter: कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Embed widget