एक्स्प्लोर

महापालिका निवडणूक : श्रीपाद छिंदमच्या भावाने ईव्हीएम मशीनची पूजा केली

श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मात्र त्याला तडीपार करण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केली. यामुळे अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमच्या भावाने चक्क मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा केली आहे. श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम याने सकाळी ईव्हीएम मशीनची विधीवत पूजा केली. श्रीपाद छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. मात्र त्याला तडीपार करण्यात आले आहे. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केली. यामुळे अहमदनगरमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या कृत्यावर निवडणूक आयोग काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न : खासदार दिलीप गांधी यावर बोलताना हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे असं म्हणून भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी या प्रश्नाला बगल दिली आहे. काल शिवसेना कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी नगरच्या राजकारणाला वेगळे वळण देण्यासाठी असे आरोप भाजपवर केले जात आहेत, असंही यावेळी गांधी म्हणाले. दरम्यान, राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले आहे. त्यामुळे  शहरात कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरु आहे.

महापालिका निवडणूक :  मतदानाला सुरुवात, शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ल्याने तणाव

अहमदनगर महापालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सागर थोरात असं या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागरवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्याकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. मात्र या प्रकरणामागे भाजपचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीला जनता निवडून देणार असल्यानेच शिवसेनेच्या पायाखालची जमीन घसरल्याने सिवसेना असे आरोप करत असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. ऐन निवडणुकीच्या मतदानाआधी ही घटना घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये 351 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत 2 लाख 56 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र असून त्यातील 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 6 पोलीस उपअधीक्षकांसह 2 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून 2 हजार निवडणूक कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणिकीच्या रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व म्हणजे 68 जागांवर आपले उमेदवार दिले आहे. विशेष म्हणजे यात 35 महिला उमेदवार भाजपने दिल्या आहेत. तर शिवसेनेने 61 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादीने 46 तर कॉंग्रेसने 21 उमेदवार या निवडणुकीसाठी मैदानात उतरवले आहेत. अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचा पहिला महापौर झाला होता. विशेष म्हणजे आजपर्यंत कुठल्याही पक्षाने 5 वर्षे महापालिकेवर सत्ता केलेली नाही. अडीच वर्षाच्या टर्मनंतर महापौरपदाची निवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार हे पाहावे लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aslod Nandurbar : नंदुरबारच्या असलोद गावात दारूबंदीसाठी महिलांचं मतदानAmol Khatal : थोरातांच्या 40 वर्षांच्या गडाला सुरुंग; जायंट किलर अमोल खताळ EXCLUSIVE | विजयाचा गुलालRohit Patil News : अजितदादांचा फोन आला होता का? रोहित पाटील स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
Embed widget