एक्स्प्लोर
मूड देशाचा : भाजपला धोक्याची घंटा, सेनेला स्वबळाचा फटका बसण्याचा अंदाज
राज्यात लोकसभेच्या 48 जागांपैकी एनडीएला 16 जागा मिळतील, तर शिवसेनेच्या वाट्याला फक्त चारच जागा येतील, असं एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात दिसतं. सेना-भाजपच्या 'स्वबळा'चा यूपीएला राज्यात फायदाच होईल. कारण यूपीए (काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला) तब्बल 28 जागा मिळतील.
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'सी व्होटर' यांनी केलेलं सर्वेक्षण भाजपसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 233 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 545 जागा असलेल्या लोकसभेत बहुमताचा आकडा 272 आहे. त्यामुळे केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी एनडीएला इतरांची साथ घ्यावी लागेल. यूपीएला 167 जागा मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. मात्र यूपीएने इतरांची साथ घेतली तर बहुमताच्या दिशेने कूच करता येईल.
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले, तर एनडीएला फटका बसू शकतो. राज्यात लोकसभेच्या 48 जागांपैकी एनडीएला 16 जागा मिळतील, तर शिवसेनेच्या वाट्याला फक्त चारच जागा येतील, असं एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात दिसतं. सेना-भाजपच्या 'स्वबळा'चा यूपीएला राज्यात फायदाच होईल. कारण यूपीए (काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला) तब्बल 28 जागा मिळतील.
दुसरीकडे, शिवसेना-भाजप यांनी दिलजमाई करत युती केली, तर मात्र एनडीएला फायदाच होईल. राज्यात लोकसभेच्या 48 जागांपैकी एनडीएला 32 जागा मिळतील, तर यूपीएच्या खात्यात फक्त 16 जागा असतील.
विशेष म्हणजे दक्षिणेकडील राज्यांमध्ये एनडीएला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. फक्त एनडीएच नाही, तर यूपीएलाही आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यांमध्ये भोपळाही फोडता येणार नाही, असा अंदाज 'एबीपी' आणि 'सी व्होटर' यांच्या सर्वेक्षणात व्यक्त केला आहे.
एनडीए - 233
यूपीए - 167
इतर - 143
एकूण - 543
निकालानंतरची समीकरणं
शक्यता पहिली
एनडीए 233
+ इतर 45
एकूण 278
(एनडीए इतर 45 खासदारांच्या पाठिंब्यानं पुन्हा सत्तेत)
एनडीएला 233 म्हणजे भाजपला त्यापेक्षा कमीच, कारण या जागांमध्ये शिवसेना, जेडीयू वगैरे मित्रपक्षांच्याही जागा. त्या परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी उमेदवार कोण यावर डावपेच होतील. सर्वेक्षणातील नितीन गडकरी नरेंद्र मोदींना सर्वोत्तम पर्याय ठरतील का? हा प्रश्न येथे महत्वाचा ठरतो.
निकालानंतरची समीकरणं
शक्यता दुसरी
यूपीए 167
+ इतर 90
एकूण 257
(सत्तेपासून 16 जागा दूर)
नमो विरुद्ध रागा
वर्ष 2017 2019
नमो 69% 55%
रागा 26% 39%
महाराष्ट्र
(भाजप शिवसेना वेगळे लढले तर)
एनडीए - 16
शिवसेना - 4
यूपीए - 28
एकूण - 48
महाराष्ट्र
(भाजप शिवसेना एकत्र लढले तर)
एनडीए - 32
यूपीए - 16
एकूण - 48
मूड देशाचा : शिवसेना-भाजप युती व्हावी का?
उत्तर प्रदेश एनडीए - 25 यूपीए - 4 सपा-बसपा महागठबंधन - 51 एकूण - 80 बिहार एनडीए - 35 यूपीए - 5 एकूण - 40 मध्य प्रदेश एनडीए - 23 यूपीए - 6 एकूण - 29 राजस्थान एनडीए - 7 यूपीए - 18 एकूण - 25 तामिळनाडू अण्णा द्रमुक - 0 द्रमुक - 39 एकूण - 39 तीन राज्यात नमो-रागा दोघांना भोपळा आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू एकूण जागा - 81 एनडीए - 0 यूपीए - 0अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement