एक्स्प्लोर

ABP News Exit Polls 2019 : एनडीएला पुन्हा बहुमत मिळणार

या एक्झिट पोलमध्ये 543 लोकसभा मतदारसंघांपैकी 542 मतदारसंघांचा अंदाज सांगितला आहे. तामिळनाडूच्या एका जागेवर निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली होती.

Exit Polls 2019 : लोकसभेच्या सर्व टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र त्याआधी एक्झिक्ट पोलच्या माध्यमातून या निकालांचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याचं दिसतं. एबीपी-नेल्सनप्रमाणेच इतर संस्थांच्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. एनडीएला 277 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापैकी एकट्या भाजपच्या वाट्याला 227 जागा येणार असल्याचं भाकित पोलमध्ये वर्तवण्यात आलं आहे. तर यूपीएला 130च्या दरम्यान जागा मिळणार असल्याचं पोलची आकडेवारी सांगते. या पोलनुसार लोकसभा 2019 च्या निकालात एनडीएला 277, यूपीए 130, इतरांना 135 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या एक्झिट पोलमध्ये 543 लोकसभा मतदारसंघांपैकी 542 मतदारसंघांचा अंदाज सांगितला आहे. तामिळनाडूच्या एका जागेवर निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या खात्यात 336 आणि यूपीएच्या खात्यात 60 जागा गेल्या होत्या. त्यापैकी एकट्या भाजपला 282 आणि काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला होता. एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल एकूण जागा (542) एनडीए - 277 यूपीए - 130 इतर - 135 महाराष्ट्र (48) महाराष्ट्रातही भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होताना दिसत नाही. एकूण 48 जागांपैकी भाजप-शिवसेना महायुतीला 34 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या  खात्यात 14 जागा जाण्याचा अंदाज आहे. 2014 चे निकाल पाहिले असता, भाजपला 23, शिवसेनेला 18, राष्ट्रवादी काँग्रेसला 4, काँग्रेसला 2 आणि स्वाभिमानी पक्षाला 1 जागेवर विजय मिळवला होता. 2014 मध्ये शिवसेने आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. तर 2019 मध्ये पुन्हा युती करुन दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ▶️महायुती - 34 ▶️महाआघाडी - 14 पक्षनिहाय अंदाज शिवसेना - 17 भाजप - 17 काँग्रेस - 04 राष्ट्रवादी - 09 स्वाभिमानी - 01 -------------------- उत्तर प्रदेश (80) एबीपी-निल्सन एक्झिट पोलनुसार, 80 जागांच्या उत्तर प्रदेशात भाजपला 33 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसच्या झोळीत 2 जागा जाऊ शकतात. महागठबंधनला 45 जागा मिळण्याचा अनुमान आहे. एक्झिट पोलच्या आकड्यांचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजपला 2014 च्या तुलनेत 40 जागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या जागांमध्ये कोणताही फरक जाणवत नाही. काँग्रेसला कोणत्याही फायद्या-तोट्याशिवाय दोन जागांवर कायम आहे. भाजप - 33 काँग्रेस - 2 सपा-बसपा - 45 -------------------- गुजरात (26) गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या राज्यातून भाजपसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपने सर्व 26 जागांवर विजय मिळवला होता. पण यंदा भाजपला इथे 24 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळू शकतो. भाजप - 24 काँग्रेस - 02 -------------------- राजस्थान (25) एबीपी-निल्सन एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, 2014 च्या तुलनेत भाजपला राजस्थानमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाला 19 जागा मिळू शकतात. तर त्याचवेळी काँग्रेसच्या खात्यात केवळ सहा जागा येऊ शकतात. 2014 च्या तुलनेत भाजपला सहा जागा कमी मिळू शकतात. कारण त्यावेळी भाजपने सर्व 25 जागांवर यश मिळवलं होतं. तर काँग्रेसला 6 जागांचा फायदा होत आहे. भाजप - 19 काँग्रेस - 06 -------------------- बिहार (40) एबीपी-निल्सन एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये भाजपला 17 आणि जेडीयूला 11 जागा मिळू शकतात. तर  एलजेपीच्या खात्यात 6 जागा जाण्याचा अंदाज आहे. म्हणजेच एनडीए 40 पैकी 34 जागांवर विजय मिळवू शकतं. तर महागठबंधन केवळ सहा जागाच मिळवू शकतं. महागठबंधनमध्ये आरजेडीला 3, काँग्रेसला 2 आणि आरएलएसपीला 1 जागा मिळू शकते. मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएला 31 जागा मिळाल्या होत्या. आता नितीश कुमार यांच्या पुनरागमनामुळे 3 जागांचा फायदा होऊ शकतो. एनडीए - 34 महागठबंधन - 06 (आरजेडी 3, काँग्रेस 2 , आरएलएसपी 1) -------------------- छत्तीसगड (11) एबीपी-निल्सन एक्झिट पोलनुसार, भाजपला छत्तीसगजच्या 11 जागांपैकी 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या झोळीत 5 जागा जाऊ शकतात. या आकड्यांवरुन स्पष्ट आहे की, राज्यात भाजपला 2014 च्या तुलनेत मोठं नुकसान होत आहे. भाजपला 4 जागा कमी मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला चार जागांचा फायदा होणार असल्याचं दिसतं. भाजप - 06 काँग्रेस - 05 -------------------- उत्तराखंड (05) उत्तर प्रदेशला लागून असलेल्या उत्तरांखडमध्ये लोकसभेच्या पाच जागा आहेत. एक्झिट पोलनुसार इथे भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपला उत्तराखंडमध्ये 04 जागांवर विजय मिळू शकतो तर काँग्रेस इथे एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या विजयी उमेदवारांबाबत बोलायचं झालं तर त्यात टिहरी गढ़वालमधून माला राज्य लक्ष्मी, गढ़वालमधून मेजर बीसी खंडूडी, नैनीलात-उधमसिंह नगरमधून भगत सिंह कोश्यारी, अल्मोड़ामधून अजय टम्टा आणि हरिद्वारमधून रमेश पोखरियाल निशंक यांचा समावेश आहे. भाजप - 04 काँग्रेस- 01 -------------------- मध्य प्रदेश (29) एबीपी-निल्सन एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात भाजपला 29 लोकसभा जागांपैकी 22 जागांवर विजय मिळू शकतो. काँग्रेसच्या खात्यात 7 जागा जाऊ शकतात. मतदारसंघांच्या संख्येच्या हिशेबाने मध्य प्रदेश, देशातील सातवं मोठं राज्य आहे. भाजप - 22 काँग्रेस - 07 -------------------- पश्चिम बंगाल (42) एबीपी-निल्सन एक्झिट पोलनुसार, पश्चिम बंगालच्या 42 लोकसभा जागांवर ममता बॅनर्जी यांची जादू कायम आहे. तृणमूल काँग्रेसची कामगिरी यंदाही चांगली राहणार आहे. मात्र मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप टीएमसीला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, टीएमसीला 24 जागा, भाजपला 16 आणि काँग्रेसला 2 जागा मिळू शकतात. तर डाव्यांचे हात रिकामे राहू शकतात. तृणमूल काँग्रेस- 24 भाजप - 16 काँग्रेस - 02 -------------------- झारखंड (14) झारखंडमध्ये भाजपला नुकसान होत असल्याचं एबीपी-निल्सनच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. एकूण 14 लोकसभा जागांच्या या राज्यात एक्झिट पोलच्या आकड्यानुसार, भाजपला 6 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर जेएमएम (झारखंड मुक्ती मोर्चा) आणि जेव्हीएम (झारखंड विकास मोर्चा) ला खातंही उघडता येणार नाही. त्यामुळे एक्झिट पोलनुसार, भाजपला 6 जागांचं नुकसान होऊ शकतं. तर काँग्रेसला आठ जागाचा फायदा होण्याचा अंदाज आहे. भाजप - 06 काँग्रेस - 06 -------------------- पंजाब (13) पंजाबच्या 13 जागांपैकी भाजपला 5 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज एबीपी-निल्सन एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला 8 जागा मिळतील तर आम आदमी पक्षाला खातंही उघडता येणार नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्याच्या 13 लोकसभा जागांपैकी भाजपला 2, अकाली दलाला 4, आम आदमी पक्षाला 4 तर काँग्रेसला 3 जागांवर विजय मिळाला होता. कॉंग्रेस 08 भाजप 05 -------------------- हरियाणा (10) एबीपी-निल्सन एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, हरियाणाच्या सर्व 10 लोकसभा जागांपैकी भाजपला 7 जागा मिळू शकतात. काँग्रेसच्या झोळीत 03 जागा जाऊ शकतात. आकड्यांवरुन स्पष्ट आहे की, भाजप हरियाणात पुन्हा एका आपली उत्तम कामगिरी कायम ठेवणार आहे. हरियाणात भाजपला 2014 च्या तुलनेत एकाही जागेचं नुकसान होत नाही. तर काँग्रेसला दोन जागांचा फायदा होऊ शकतो. भाजप 07 काँग्रेस 03 -------------------- हिमाचल प्रदेश (04) एबीपी-निल्सन एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशच्या 4 लोकसभा जागापैंकी भाजपला सर्व चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला भोपळाही फोडता येणार नाही. भाजप मागच्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही आपली कामगिरी कायम ठेवणार आहे. भाजप 04 -------------------- जम्मू-काश्मीर (06) एबीपी-निल्सन एक्झिट पोलमध्ये जम्मू-काश्मीर राज्याच्या 6 लोकसभा जागांपैकी भाजपला 2, पीडीपी को 2, नॅशनल कॉन्फरन्सला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलवरुन स्पष्ट होतं की, राज्यात भाजपला 1 जागेचं नुकसान होत आहे. तर पीडीपीलाही एका जागेचं नुकसान होत आहे. तर यंदाही काँग्रेसला इथे खातं खोलता आलेलं नाही. भाजप 02 नॅशनल कॉन्फरन्स 02 पीडीपी 02 -------------------- दिल्ली (07) एबीपी-निल्सनच्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीच्या सात लोकसभा जागांपैकी भाजपच्या झोळीत 5 जागा जाऊ शकतात. काँग्रेसला 1 जागा मिळू शकते. तर आपच्या खात्यात 1 जागा जाण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला 2014 च्या तुलनेत दोन जागांचा तोटा होत आहे. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी एका जागेचा फायदा होताना दिसत आहे. भाजप 05 कॉंग्रेस 01 आप 01 -------------------- ओदिशा (21) ओदिशामध्ये भाजपचा परफॉर्मन्स सुधारताना दिसत आहे. एबीपी-निल्सन एक्झिट पोलनुसार भाजपला 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाच्या जागा कमी होऊन आकडा 12 वर पोहोचला आहे. भाजपला 8 जागांचा फायदा तर बीजेडीला 8 जागांचं नुकसान होण्याचा अंदाज आहे. भाजप 09 बीजेडी 12 -------------------- केरळ (20) एबीपी-निल्सनच्या एक्झिट पोलनुसार, केरळच्या 20 लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस 11, भाजप 1, मुस्लीम लीग 2, सीपीएम 4, केईसीएम 1, आरएसपी 1 जागेवर विजय मिळवू शकतात. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्यास यशस्वी झाली आहे. 2014 च्या  लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसला जास्त नुकसान होणार नाही. काँग्रेस 11 मुस्लीम लीग 02 सीपीएम 04 भाजप 01 आरएसपी 01 केईसीएम 01 -------------------- तामिळनाडू (39) तामिळनाडूत यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात AIADMK ची जादू दिसणार नाही. तर  DMK चं जोरदार पुनरागमन होऊ शकतं. एक्झिट पोलच्या आकड्यानुसार, 39 जागांच्या तामिळनाडूत एआयएडीएकेला 6, भाजपला 1, सीपीआयला 1, सीपीएमला 2, डीएमकेला 13, काँग्रेसला 7, एमडीएमकेला  1, पीएमकेला 2, व्हीकेसीला 1 आणि इतरांना तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे. एआयएएडीएके 06 भाजप 01 सीपीआय 01 सीपीएम 02 डीएमके 13 काँग्रेस 07 एमडीएमके 01 पीएमके 02 व्हीकेसीला 01 इतर 03 -------------------- तेलंगणा (17) एक्झिट पोलनुसार, टीआरएस राज्यातील 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवू शकतो. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला 1 आणि काँग्रेसला 1 जागा मिळू शकते. तेलंगणा स्वतंत्र राज्य बनल्यानंतर 2 जून 2014 रोजी केसीआर पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. टीआरएस 15 एमआयएम 01 काँग्रेस 01 -------------------- पूर्वोत्तर भारत (25) एबीपी-निल्सन एक्झि पोलनुसार, पूर्वोत्तर भारतातील 25 लोकसभा मतदारसंघांपैकी 13 जागा भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सहा जागा मिळू शकतात. तर इतरांच्या खात्यात 6 जागा जाऊ शकतात. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार स्पष्ट आहे की, पूर्वोत्तरमध्ये भाजपला मोठा फायदा होत आहे. पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेशात 2, आसममध्ये 14, मणिपूरमध्ये 2, मेघालयमध्ये 2, मिझोरममध्ये 1, नागालॅण्डमध्ये 1 आणि त्रिपुरामध्ये दोन जागा आहेत. भाजप 13 काँग्रेस 06 इतर 06 संबंधित बातम्या
Exit Poll 2019 Maharashtra : महायुतीला फटका, महाआघाडीच्या काहीच जागा वाढणार Exit Poll 2019 Uttar Pradesh (UP): उत्तर प्रदेशात एनडीएला मोठा धक्का, महागठबंधनची महामुसंडी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!

व्हिडीओ

Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
Nagpur Election 2026 : नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Embed widget