पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची कामगिरी कशी? राजस्थानमध्ये गेहलोतांची जादू की भाजपची शिष्ठाई; सर्वेक्षणातून जनतेचा धक्कादायक कौल
CVoter Survey: राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. एबीपी न्यूजसाठी केलेल्या सी-व्होटर सर्वेक्षणात, जनतेने बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे.
ABP News CVoter Survey: राजस्थान विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Assembly Elections 2023) तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबतच मतदारांचीही धाकधूक वाढत आहे. राज्यात सुमारे 30 वर्षांपासून सुरू असलेली दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा कायम राहणार की सत्ताधारी काँग्रेस सत्ता राखून विक्रम निर्माण करणार, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.
राजस्थानमध्ये 1993 च्या निवडणुकीपासून दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत आहे. या काळात केवळ काँग्रेस आणि भाजपचीच सरकारे स्थापन झाली आहेत. राज्यात विधानसभेच्या 200 जागा आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे आणि उर्वरित चार राज्यांसह (मध्यप्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराम (Mizoram)) 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राजस्थानमधील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी सी-व्होटरनं नुकतंच एबीपी न्यूजसाठी एक सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याचा अंदाजही सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून व्यक्त होत आहे. सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नांना जनतेनं कसा प्रतिसाद दिला? ते सविस्तर जाणून घेऊयात...
सध्या राजस्थानात सर्वा महत्त्वाचा मुद्दा कोणता?
(सोर्स : सी-व्होटर)
बेरोजगारी : 34.3 टक्के
वीज/पाणी/रस्ते : 13.9 टक्के
शेतकऱ्यांचे मुद्दे : 17.2 टक्के
कायदा आणि व्यवस्था आणि महिलांची सुरक्षा : 7.6 टक्के
भ्रष्टाचार :12.4 टक्के
महागाई : 6.9 टक्के
राज्यात सर्वागिण विकास : 3.4 टक्के
इतर मुद्दे : 4.3 टक्के
सर्वेक्षणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सर्वाधिक 34.3 टक्के लोकांनी निवडणुकीपूर्वी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर शेतकऱ्यांचा प्रश्न तर तिसऱ्या क्रमांकावर वीज, पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न नमूद करण्यात आला आहे.
राज्यातील काँग्रेस सरकारची सध्याची कामगिरी कशी आहे?
(सोर्स : सी-व्होटर)
उत्तम : 42.1 टक्के
साधारण : 16.9 टक्के
खराब : 41 टक्के
सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, पण सर्वेक्षणाच्या आकडेवारीत 42.1 टक्के लोकांनी त्याची कामगिरी चांगली तर 41 टक्के लोकांनी वाईट असल्याचं सांगितलं आहे. ही काँग्रेससाठी चिंतेची बाब असू शकते.
अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी कशी होती?
(सोर्स : सी-व्होटर)
उत्तम : 43.4 टक्के
साधारण : 21.1 टक्के
खराब : 35.5 टक्के
सर्वेक्षणाच्या आकडेवारीत 43.4 टक्के लोकांनी अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली तर 35.5 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असल्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची कामगिरी कशी आहे?
(सोर्स : सी-व्होटर)
उत्तम : 60.5 टक्के
साधारण : 10.4 टक्के
खराब : 29.1 टक्के
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता राजस्थानमध्येही दिसून येत असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून दिसून येते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60.5 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान म्हणून कामगिरी चांगली असल्याचे सांगितले, 10.4 टक्के लोकांनी ते सरासरी असल्याचं सांगितलं आणि 29.1 टक्के लोकांनी ते वाईट असल्याचं सांगितलं आहे.
तुम्ही काँग्रेस सरकारवर नाराज आहात आणि ते बदलू इच्छिता?
(सोर्स : सी-व्होटर)
नाराज आहेत आणि सरकार बदलावं असं वाटतंय : 49.1 टक्के
नाराज आहेत पण सरकार बदलावं असं वाटत नाही : 21.8 टक्के
ना नाराज, ना सरकार बदलावं असं वाटतंय : 29.1 टक्के
सर्वेक्षणात सर्वाधिक 49.5 टक्के लोकांनी सांगितलं की, ते सध्याच्या गेहलोत सरकारवर नाराज आहेत आणि सरकार बदलू इच्छित आहेत, 21.8 टक्के लोकांनी सांगितलं की, ते सरकारवर नाराज आहेत पण सरकार बदलावं असं वाटत नाही. तसेच, 29.1 टक्के लोकांनी सांगितलं की, ते सध्याच्या सरकारवर नाराज नाहीत आणि सरकार बदलावं असं त्यांना अजिबात वाटत नाही.
तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला किंवा मत दिलं तरी राजस्थानच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला विजय मिळेल असं तुम्हाला वाटतं?
(सोर्स : सी-व्होटर)
भाजप : 47.7 टक्के
काँग्रेस : 42 टक्के
काहीच सांगू शकत नाही : 10.3 टक्के
असा कोणता पक्ष आहे का? ज्याला तुम्ही कधीच पाठिंबा देणार नाही, मग परिस्थिती काहीही असो?
(सोर्स : सी-व्होटर)
भाजप : 32 टक्के
काँग्रेस : 39.8 टक्के
काहीच सांगू शकत नाही : 28.2 टक्के
टीप : सी-व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणात 2,258 लोकांची मतं घेण्यात आली. सर्वेक्षणातील डेटा पूर्णपणे लोकांच्या मतांवर आधारित आहे. हे सर्वेक्षण गेल्या सोमवारी (23 ऑक्टोबर) करण्यात आलं.