राज्यात सरकार आणण्याचा उद्देश, महाराष्ट्रासाठी लढतोय, मित्रपक्षांसाठी देखील लढतोय, पदांची लालसा नाही : आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात विविध मुद्यांवर भाष्य केलं.
मुंबई : आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचं सरकार आणायचं ठरवलं आहे, ते येणार असा विश्वास व्यक्त केला. जनता आमच्यासोबत आहे, हेच महत्त्वाचं आहे. पाचोरा, महाड, परभणी, मुंबईत फिरतोय, लोकांनी आम्हाला परत या, असं सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं नाव आणि चिन्ह कुणाला द्यायचं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती, त्यात अन्याय झाला. शिवसेना कुणाची हा प्रश्नच होऊ शकत नाही. शिवसेना नाव चोरलं, चिन्ह चोरलं, चोरानं काही तरी चोरलं तरी मालक होऊ शकत नाही.
कालपण आपण पाहिलं असेल, श्रीनिवास वणगा यांना उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानसभेत निवडून आणलं होतं. आता विधानसभेला त्यांचं तिकीट कुणी कापलं, ते एकनाथ शिंदेंनी कापलं. विश्वासाघाताची परंपरा आमच्या कुटुंबात नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. अनेक लोकांनी उद्धव ठाकरेंसाठी मतदान करायचं होतं, मात्र चुकून धनुष्यबाणावर झाल्याचं सांगितल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
आमची एक जागा, उत्तर पश्चिमची जागा चोरली. मुंबईत 5-1 असा निकाल लागला असता. भाजप ईडी, आयटी, सीबीआय, सगळी यंत्रणा, निवडणूक आयोग हातात ठेवून नऊवर आहेत. आमच्याकडचे 40 आमदार जाऊन, 12 खासदार जाऊन, स्थानिक नेते जाऊन आम्ही 9 वर आहे. कल्याणमध्ये वैशालीताई दरेकर यांना साडे चार लाख मतदानं मिळालं आहे, ते पाहा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या दोन रिल पाहिल्या आहेत, त्यामध्ये माझा कट्ट्यावरील नाही, नाही, नाही असं काही तरी सांगितलं होतं, यांच्यासोबत जाणार नाही, हा धर्म तो धर्म सांगितलं होतं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीची रिल पाहिलं होतं. देवेंद्र फडणवीस माझ्या अल्गोरिदमवर येत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचं नवाब मलिक यांच्यावरील रिलं पाहिलं होतं. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून निवडणूक लढत आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
भाजपकडून सूरतच्या लुटीचा बदला
भाजपकडून सूरतच्या लुटीचा बदला घेतला जात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. संविधानाला जो धोका होता त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे. गेल्या अडीच वर्षात राज्याची जी स्थिती झालेली आहे. त्या काळात राज्यात एक मोठा उद्योग आलेला नाही. वर तुम्ही खाली तुम्ही देखील असताना राज्यात एकही मोठा उद्योग आलेला नाही, अशी टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली.
यूपीएनं राज्याला दिलेलं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरला गुजरातला हलवण्यात आलं. बुलेट ट्रेनला फुकटात भूखंड दिला, टाटा एअरबसच्या प्रकल्पासाठी पंतप्रधान मोदींनी रोड शो घेतला. भाजपला महाराष्ट्रातील तरुण काय विचार करतात हे पडलं नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात आला असतं तर बिघडलं असतं का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. वेदांता फॉक्सकॉन तळेगावला येणार होतं ते गेलं. एकनाथ शिंदेंनी मोठा प्रकल्प आणणार असं सांगितलं होतं, तो आला नाही. बल्क ड्रग पार्क, एअरबस टाटा प्रकल्प विदर्भातून गेला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मविआ महाराष्ट्र हितासाठी लढतेय : आदित्य ठाकरे
महाविकास आघाडीत छोटा भाऊ मोठा भाऊ नाही, आम्ही सगळेजण महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. मविआत पक्के बसलो आहोत, आम्ही एकट्याचा विचार करत नाही. आम्ही जी चर्चा करतो ती स्पष्टपणे करतो. महाराष्ट्र भाजप शिवसेनाप्रमुखांमुळं वाढला, आमचा पक्ष फोडला मग पवार परिवार का फोडला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
आम्ही साधी सोपी लोकं आहोत,राजकारणी लोक नाहीत, आम्ही महाराष्ट्रप्रेमी, देशप्रेमी आहे, शब्द पाळण्याचं राजकारण करतो. महाराष्ट्रातील सर्वात विश्वासू नेता म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव येत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी वाद घालत नाही आहोत.महाराष्ट्रासाठी लढतोय, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. स्ट्राईक रेट काही असो, हिट विकेट व्हायचं नाही, रन आऊट व्हायचं नाही हे ठरलंय, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या:
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा