एक्स्प्लोर

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील 14 जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात बारामती, जालना, माढा, अहमदनगर, कोल्हापूर, हातकणंगले, औरंगाबाद, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी-सिंधूदुर्ग, जळगाव आणि रावेर या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या 14 जागांपैकी बारामती, माढा, सातारा आणि कोल्हापूर या चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या तर उरलेल्या दहा जागा युतीने जिंकल्या होत्या,

मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात बारामती, जालना, माढा, अहमदनगर, कोल्हापूर, हातकणंगले, औरंगाबाद, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी-सिंधूदुर्ग, जळगाव आणि रावेर या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. 2014 साली या 14 जागांपैकी बारामती, माढा, सातारा आणि कोल्हापूर या चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या तर उरलेल्या दहा जागा युतीने जिंकल्या होत्या, त्यात हातकणंगल्याच्या जागेचाही समावशे होता. तिथे राजू शेट्टींना युतीचा पाठींबा होता. यावेळी राजू शेट्टी काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात आहेत. बारामती : शरद पवारांच्या घरच्या मैदानात 58.83 टक्के मतदान झालं होतं. 18 लाख 13 हजार 553 मतदारांपैकी 10 लाख 66 हजार 963 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना ५ लाख 21 हजार 512 मतं पडली होती तर महायुतीतल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मतं पडली होती. सुप्रिया सुळे 69 हजार 719 मतांनी विजयी झाल्या होत्या. बालेकिल्ल्यात घटलेलं मताधिक्य लाखोंच्या फरकाने जिंकायची सवय असलेल्या पवारांसाठी काही अंशी चिंतेची गोष्ट होती. यंदा सुळेंसमोर भाजपच्या कांचन कुल यांचं आव्हान असणार आहे. जालना : या मतदारसंघात 66.15 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 12 हजार 56 मतदारांपैकी 10 लाख 66 हजार 375 मतदारांनी मतदान केलं. भाजपचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना 5 लाख 91 हजार 428 मतं पडली होती तर काँग्रेसच्या विलास औताडे यांना 3 लाख 84 हजार 630 मतं पडली होती. रावसाहेब दानवे 2 लाख 6 हजार 798 मतांनी विजयी झाले होते. दानवेंना केंद्रात राज्यमंत्रीपद सुद्धा मिळालं होतं, मात्र गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर दानवेंचं मंत्रीपद गेलं आणि त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन परत राज्यात पाठवलं गेलं. यंदा दानवे आणि शिवसेनेच्या अर्जुन खोतकर वादामुळे हा मतदारसंघ जास्त चर्चेत राहिला. मनाने दुखावलेला शिवसैनिक दानवेंना खरंच साथ देतो का यावर निकाल अवलंबून आहे. माढा : या मतदारसंघात 17 लाख 28 हजार 322 मतदारांपैकी 62.53 टक्के म्हणजे 10 लाख 80 हजार 167 मतदारांनी मतदान केलं होतं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील अटीतटीच्या लढतीत 25 हजार 344 मतांनी विजयी झाले होते. मोहिते पाटलांना 4 लाख 89 हजार 989 मतं पडली होती तर भाजपच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या स्वाभिमानी पक्षाच्या सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 मतं पडली होती. यावेळी मोहिते पाटील भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. अहमदनगर : या मतदारसंघात 62.33 टक्के म्हणजेच 17 लाख 5 हजार 5 पैकी 10 लाख 62 हजार 780 मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपच्या दिलीप गांधी यांना 6 लाख 5 हजार 185 मतं तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या राजीव राजळे यांना 3 लाख 96 हजार 63 मतं पडली होती. गांधी 2 लाख 9 हजार 122 मतांनी विजयी झाले होते. यंदा सुजय विखे पाटील थेट भाजपमध्ये सामील झाल्याने इथली सगळी समीकरणं उलटीपालटी झाली आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचं आव्हान आहे. पक्षापेक्षा गुंतागुंतीच्या नातेसंबंधावर इथला निकाल अवलंबून असणार आहे. कोल्हापूर : या मतदारसंघात 71.72 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 58 हजार 293 मतदारांपैकी 12 लाख 61 हजार 18 मतदारांनी मतदान केलं. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना 6 लाख 7 हजार 665 मतं पडली होती, तर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना 5 लाख 74 हजार 406 मतं पडली होती. महाडिक 33 हजार 259 मतांनी विजयी झाले होते. हातकणंगले : या मतदारसंघात 73 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 30 हजार 604 मतदारांपैकी 11 लाख 90 हजार 332 मतदारांनी मतदान केलं होतं. महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे राजू शेट्टी 1 लाख 77 हजार 810 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 6 लाख 40 हजार 428 तर काँगेसच्या कलाप्पा आवाडे यांना 4 लाख 62 हजार 616 मतं पडली होती. VIDEO | तापलेल्या राजकीय वाऱ्याचं रिमिक्स....! लावला रे व्हिडीओ | सुपर सॉरी | एबीपी माझा औरंगाबाद : शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात 61.85 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 89 हजार 395 मतदारांपैकी 9 लाख 83 हजार 57 मतदारांनी मतदान केलं. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं पडली होती तर काँग्रेसच्या नितीन पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं पडली होती. खैरे 1 लाख 62 हजार मतांनी जिंकले होते. यंदा इथे चौरंगी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील मैदानात आहेत, तर मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, त्यामुळे औरंगाबादची लढत घासून होईल असं बोललं जातंय. सांगली : मतदारसंघात 63.52 टक्के मतदान झालं होतं. 16 लाख 49 हजार 107 मतदारांपैकी 10 लाख 47 हजार 510 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपने संजयकाका पाटील यांना तिकीट दिलं होतं. मोदी लाटेत काँग्रेसच्या गडाला भाजपने सुरंग लावला होता. संजयकाका तब्बल 2 लाख 39 हजार 292 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 6 लाख 11 हजार 563 मतं पडली होती. तर काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांना 3 लाख 72 हजार 271 मतं पडली होती. सातारा : या मतदारसंघात 56.79 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 19 हजार 998 मतदारांपैकी 9 लाख 76 हजार 02 मतदारांनी मतदान केलं. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 5 लाख 22 हजार 531 मतं पडली होती तर अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांना 1 लाख 55 हजार 937 मतं पडली होती. यंदा उदयनराजेंविरोधात युतीने माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना उतरवले आहे. पुणे : मतदारसंघात 54.14 टक्के मतदान झालं होतं. 18 लाख 35 हजार 835 मतदारांपैकी 9 लाख 93 हजार 966 मतदारांनी मतदान केलं. भाजपच्या अनिल शिरोळे यांना 5 लाख 69 हजार 825 मतं पडली होती तर काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 56 मतं पडली होती. शिरोळे तब्बल 3 लाख 15 हजार 769 मतांनी विजयी झाले होते. यंदा पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात लढाई रंगणार आहे. वाचा : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 10 जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती? रायगड : राज्यात सर्वात अटीतटीच्या लढतींपैकी एक रायगडमध्ये लढली गेली होती. तिथे 64.47 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 32 हजार 781 मतदारांपैकी 9 लाख 88 हजार 192 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवसेनेच्या अनंत गीतेंनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचा फक्त 2110 मतांनी पराभव केला होता. गीतेंना 3 लाख 96 हजार 178 मतं पडली होती तर तटकरेंना 3 लाख 94 हजार 68 मतं पडली होती. शेकापच्या उमेदवाराला सव्वा लाखांवर तर बसपच्या उमेदवाराला 10 हजारावर मतं पडली होती. सुनील तटकरे नावाच्या अपक्ष उमेदवाराला सुद्धा 9 हजारावर मतं पडली होती. गीते केंद्रात मोदी सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री होते, यंदा त्यांची लढत पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यासोबतच असणार आहे या लढतीकडे सर्वांचं लक्ष असेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंमुळे चर्चेत असणाऱ्या या मतदारसंघात 65.56 टक्के मतदान झालं होतं. 13 लाख 67 हजार 362 मतदारांपैकी 8 लाख 96 हजार 409 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. शिवसेनेचे विनायक राऊत यांना 4 लाख 93 हजार 88 मतं पडली होती तर तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या निलेश राणे यांना 3 लाख 43 हजार 37 मतं पडली होती. विनायक राऊत 1 लाख 50 हजार 51 मतांनी विजयी झाले होते. जळगाव : मतदारसंघात 57 टक्के मतदान झालं होतं. 17 लाख 7 हजार 969 मतदारांपैकी 9 लाख 90 हजार 604 मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपच्या ए. टी. नाना पाटील यांना 6 लाख 47 हजार 773 मतं पडली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश पाटील यांना 2 लाख 64 हजार 248 मतं पडली होती. ए.टी. पाटील तब्बल 3 लाख 83 हजार 525 मतांनी विजयी झाले होते. रावेर : राज्यातले भाजपचे महत्त्वाचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या या मतदारसंघात 63.48 टक्के मतदान झालं होतं. 15 लाख 93 हजार 389 मतदारांपैकी 10 लाख 11 हजार 417 मतदारांनी मतदान केलं होतं. भाजपच्या रक्षा खडसे यांना 6 लाख 5 हजार 652 मतं पडली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिष जैन यांना 2 लाख 87 हजार 384 मतं पडली होती. रक्षा खडसे तब्बल 3 लाख 18 हजार 68 मतांनी विजयी झाल्या होत्या. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीच्या काळात नाथाभाऊ आजारी पडल्यामुळे रक्षा खडसे यांच्यासमोरील आव्हान सोपं नसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget