एक्स्प्लोर

शिवसेनेसोबत जाण्याबाबत काँग्रेस द्विधा मनस्थितीत, सोनिया गांधी अनुकूल का नाहीत?

महाराष्ट्रात नेमकं कुठलं सरकार येणार, याचा सस्पेन्स अजून कायम आहे. काल दिल्लीत शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीने हा सस्पेन्स आणखी वाढला. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी भूमिका जाहीर केली. पण महाराष्ट्रातल्या घडामोडींवर सोनियांचा कल नेमका काय आहे?

मुंबई : शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीत नेमकं काय झालं? मुख्यमंत्रीपदावरुन सध्या शिवसेना जोरदार गुरगुर करतेय, पण ज्या दुसऱ्या पर्यायाची चाचपणी शिवसेनेला करावी लागेल त्यात काँग्रेसची भूमिका कळीची ठरणार आहे. म्हणूनच काल दिल्लीत पवार आणि सोनियांची भेट ही महाराष्ट्राच्या सत्ताकारणावर परिणाम करणारी होती. काय होता या बैठकीत सोनियांचा मूड, शिवसेनेबद्दल सोनिया गांधींना नेमकं काय वाटतं, याची खास माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. काँग्रेस हायकमांडला शिवसेनेबद्दल काय वाटतं? - काँग्रेसचं दिल्ली हायकमांड अदयाप शिवसेनेबद्दल द्विधा मनस्थितीत आहे. - भाजपला धडा शिकवण्यासाठी राज्यातले नेते सेनेसोबत जायची इच्छा व्यक्त करत असले तरी केंद्र स्तरावरचे नेते मात्र सेनेबद्दल काहीसे साशंक आहेत. - राष्ट्रीय पातळीवरच्या काही मुद्द्यांवर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये टोकाची भूमिका आहे. त्यामुळे केवळ भाजपला दूर ठरवण्यासाठी ही अडचणीची सोयरीक करायची का हा काँग्रेससमोरचा प्रश्न आहे. सोनिया गांधी सध्या शिवसेनेबद्दल अनुकूल नसल्या तरी राष्ट्रवादी-शिवसेनेच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत असंही नाही. कारण राज्यातल्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवार पुन्हा सोनिया गांधींना भेटणार आहेत. त्यामुळे या बैठकीतच काँग्रेसच्या भूमिकेबद्दल स्पष्टता येईल. तोपर्यंत शिवसेना-भाजपच्या खेळाचं काय होतं यावरही बरंच काही अवलंबून असेल. काँग्रेस आणि शिवसेना राजकीय विचारांची दोन टोकं असली तरी राजकारणात अनेकदा व्यवहार्य भूमिका घेत त्यांनी हातमिळवणी केल्याचा इतिहास आहे. 1980 सालचं मार्मिकचं हे मुखपृष्ठ त्याचीच आठवण करुन देणारं आहे. हाताचा आणि वाघाचा पंजा..दोघेही एकमेकांना साथ देत उभे आहेत. शिवाय छत्री उडाली, कमळे बुडाली, जनता धन्य धन्य झाली..अशी टोलेबाजीही करण्यात आली आहे. 1997 साली शिवसेनेच्याच पाठिंब्यावर काँग्रेसचे मुरली देवरा मुंबईत महापौर झाले. राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना एनडीएत असूनही शिवसेनेने जाहीरपणे पाठिंबा दिला होता. शिवसेनेने आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींना पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे आता भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला मदत करणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेला थेट समर्थन करण्याऐवजी काँग्रेस बाहेरुन पाठिंब्याचं पाऊल उचलू शकतं. पण या सगळ्या समीकरणाची सुरुवात नेमकी कशी होणार हा देखील प्रश्न आहे..कारण त्यासाठी शिवसेनेला पुढाकार घेऊन सत्तास्थापनेचा दावा करावा लागेल...किंवा भाजपने सरकार स्थापन केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तिघांची युती पाहायला मिळू शकते. नेमकं काय होतंय हे लवकरच कळेल, पण तोपर्यंत महाराष्ट्रात पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोलBadlapur Case : बदलापूर प्रकरणातील सहआरोपी फरार, कोर्टाने सरकारला झापलं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Embed widget