एक्स्प्लोर
इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमावर आधारित 'टिलीमिली' महामालिका सह्याद्री वाहिनीवर
इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमावर आधारित 'टिलीमिली' महामालिका 20 जुलैपासून सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशनद्वारे मालिका प्रक्षेपित होणार असून यामुळं दीड कोटी विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे 14 मार्च पासून राज्यातील शाळा लॉकडाऊनमुळे बंद असताना त्या कधी उघडतील? याबाबत अजूनही अनिश्चिता असताना या कोरोना महामारीच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी विविध पर्यायांचा अवलंब, विचार शिक्षण विभागाकडून केला जात आहे. त्यात पुण्याच्या स्वयंसेवी संस्था 'एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन'ने इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेसाठी मराठी माध्यमातील पहिल्या सत्रातील शिक्षण दूरदर्शनवरील 'सह्याद्री' वाहिनीवर विद्यार्थ्यांना मोफत मिळावे यासाठी 'टिलीमिली' महामालिका सुरू करण्याचे ठरविले असून 20 जुलैपासून ही मालिका विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार असून जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांना यामुळे लाभ मिळणार असल्याची माहिती एमकेसीएलंकडून देण्यात आली आहे. मात्र, दूरदर्शनवर शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने सह्याद्री वहिनीला वेळ मागून सुद्धा मिळाली नसून आता याबाबत हा उपक्रम सुरू करण्याची एमकेसीएल स्वयंसेवी संस्थेला सह्याद्री वाहिनीकडून वेळ दिली गेली आहे.
यूजीसीने जारी केलेल्या गाईडलाईन्स विद्यार्थ्यांच्या दृष्टीने धक्कादायक : उदय सामंत
या उपक्रमात शिक्षण क्षेत्रात काम केलेल्या 'ग्राममंगल' व इतर संस्था तसेच तज्ञांचा सहभाग असणार आहे. 'टिलीमिली' मालिका बालभारतीच्या इयत्ता पहिली ते आठवी अभ्यासक्रमातील सर्व पाठांवर आधारित असणार आहे. यामध्ये कंटाळा आणणारी व्याख्याने नसतील, विद्यार्थ्यांना परिसरात करून बघता येतील असे कृतिशील शैक्षणिक अनुभव कसे घेता येतील यावर या मालिकेमध्ये माहिती दिली जाणार आहे. ही महामालिका सह्याद्री वाहिनीवर 20 जुलैपासून रविवार वगळता रोज सकाळी साडे 7 ते दुपारी साडे 12 च्या दरम्यान प्रक्षेपित केली जाणार आहे.
एकूण सर्व इयत्तेसाठी 480 एपिसोड असलेली ही महामालिका 20 जुलै ते 26 सप्टेंबर 2020 या कालावधीत दाखवली जाईल. यामध्ये रोज प्रत्येक इयत्तेचा 1 पाठ असे प्रत्येक इयत्तेसाठी 60 पाठ प्रक्षेपित करून शिकवले जातील.
'टिलीमिली' मालिकेचे वेळापत्रक
सकाळी साडे सात ते आठ वाजता - इयत्ता आठवी
सकाळी आठ ते साडे आठ - इयत्ता सातवी
सकाळी नऊ ते साडे नऊ - इयत्ता सहावी
सकाळी साडे नऊ ते दहा - इयत्ता पाचवी
सकाळी दहा ते साडे दहा - इयत्ता चौथी
सकाळी साडे दहा ते अकरा - इयत्ता तिसरी
सकाली साडे अकरा ते दुपारी बारा - इयत्ता दुसरी
दुपारी बारा ते साडे बारा- इयत्ता पहिली
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement