Teacher Training : 12 वीच्या परिक्षा सुरु असताना मुंबईतील 4 हजार शिक्षकांना ट्रेनिंग, प्रशिक्षण पुढे ढकला; शिक्षक संघटनांची मागणी
Teacher Training, Mumbai : राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकलची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. शिवाय, 12 वी ची परिक्षा तोंडावर आली आहे.
Teacher Training, Mumbai : राज्यातील शाळांमध्ये दहावी बोर्डाच्या तोंडी व सायन्स प्रॅक्टिकलची कामे सुरू आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी सुरू आहे. शिवाय, 12 वी ची परिक्षा तोंडावर आली आहे. त्यातच मुंबईतील शिक्षकांना 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षणाला विरोध करीत ट्रेनिंग(Teacher Training) पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई (Mumbai)यांच्याकडे ही मागणी केली आहे.
4 हजार शिक्षकांना प्रशिक्षण
नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने इयत्ता 9 वी ते 12 वीच्या शिक्षकांना "शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण" देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांना नुकतेच खोपोली येथे प्रशिक्षण देण्यात आले. आता हे तज्ञ मार्गदर्शक मुंबईतील 4 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये
तथापि, शिक्षकांना 10 वी व 12 वीचे विज्ञान प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, बोर्डाची ऑनलाइन कामे करावयाची आहेत. 1 मार्चपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च महिन्यात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणी भाजप नेते अनिल बोरनारे यांनी केली आहे.
पहिल्याच पेपर दिवशी कॉपी बहाद्दर पकडले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस बुधवारी (21 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावर्षीही परिक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला कॉपी बहाद्दर समोर आले आहेत. मराठवाड्यीत काही परिक्षाकेंद्रांवर एकूण 40 जणांना कॉपी करत असताना पकडण्यात आले आहे. परभणीतील एकाच परिक्षा केंद्रावरुन तब्बल 20 जणांना कॉपी करत असताना पकडण्यात आलंय.
इतर महत्वाच्या बातम्या
बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! मराठवाड्यात 40 कॉपीबहाद्दर पकडले
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI