सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना फटका; अनेकांचा हिंदीचा पेपरच बुडाला
SCC Viral Time Table: सोशल मीडियात व्हायरल वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकामुळे अनेकांचा हिंदीचा पेपरच बुडाला आहे.
SCC Viral Time Table: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक दहावीचं वेळापत्रक (SSC Exam Time Table) व्हायरल झालं आहे. याच व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर (Hindi Subject Paper) बुडाल्याची माहिती मिळत आहे. एसएससी बोर्डाच्या (SSC Board) वेळापत्रकात जो पेपर 8 मार्चला दाखवण्यात आला होता. तोच पेपर व्हायरल वेळापत्रकात (Viral Time Table) 9 मार्चला दाखवण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आणि अनेक विद्यार्थ्यांचा हिंदीचा (SSC Hindi Subject Paper) पेपर बुडाला.
दहावी बोर्ड परीक्षा (10th Exams) देणाऱ्या विद्यार्थ्यांना वायरल झालेल्या वेळापत्रकाचा (Time Table) फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवून अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला आहे. दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर होता. हॉल तिकीटावर देखील 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर असल्याचं बोर्डाकडून नमूद केलेलं आहे. मात्र आठ मार्चला हिंदीचा पेपर असतानासुद्धा काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवला.
या व्हायरल झालेल्या वेळापत्रकामध्ये हिंदी विषयाचा पेपर हा 9 मार्च रोजी होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी 8 मार्चचा हिंदीचा पेपर जो हॉल तिकीटवरील वेळापत्रकानुसार होता, तो न दिल्यामुळे या विद्यार्थ्यांची त्या पेपरला अनुपस्थिती लागली आहे.
पाहा व्हिडीओ : SSC Viral Exam Timetable : व्हायरल वेळपत्रकामुळे गोंधळ, 8 मार्चचा हिंदीचा पेपर मुलांचा बुडाला
बोर्डाच्या सूचनेनंतरही विद्यार्थ्यांकडून चूक
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक सेंटरवर असा प्रकार घडल्याची माहिती बोर्डाकडून आणि पर्यवेक्षकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बोर्डाने पुन्हा एकदा सूचना करत हॉल तिकीटावर छापील वेळापत्रकावरच विश्वास विद्यार्थ्यांनी ठेवावा. व्हायरल झालेल्या कुठल्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, अशा सूचना पुन्हा एकदा दिल्या आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांचा पेपर चुकणं आणि व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांची आणि पालकांचीच चूक असून याआधीसुद्धा वेळापत्रकाविषयी बोर्डाने अनेकदा सूचना केल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षा देणं हाच एकमेव पर्याय
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर चुकला. त्यांच्यासमोर आता जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षा देणं हाच एकमेव पर्याय असणार आहे. शिवाय या विद्यार्थ्यांना एटी-केटीच्या सुविधेमुळे अकरावी प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी झालेल्या प्रकारामुळे तणावात न येता पुढील उर्वरित पेपर चांगले सोडवावेत, असा आवाहन सुद्धा बोर्ड आणि शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI