एक्स्प्लोर

SSC-HSC Exam : दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार लेखी परीक्षा

SSC-HSC Supplementary Exam: दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीच्या (SSC-HSC EXAM) मुख्य बोर्डाच्या परीक्षेचा निकाल (Result) लागल्यावर पुरवणी परीक्षेसाठी (Supplementary Exam) अर्ज भरून घेण्यात आले होते. दरम्यान आता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची पुरवणी लेखी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. तर ही परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित केली आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) व्यवसाय अभ्यासक्रम लेखी परीक्षा मंगळवार 18 जूलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत होईल. तर इयत्ता 10 वी लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023  या कालावधीत होईल. दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 

महाविद्यालयाकडून छापील स्वरुपात वेळापत्रक दिला जाणार 

तर संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी देण्यात आल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहील. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

तोंडी परीक्षा कधी होणार? 

इ. 10 वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 व इ. 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे संबंधितानी यांची नोंद घ्यावी असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

छ. संभाजीनगर महापालिकेचा स्तुत्य उपक्रम! नापास विद्यार्थ्यांचा सत्कार, गाण्यावर ठेकाही धरला; अजब कार्यक्रमाची गजब चर्चा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
Embed widget