(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Railway Vacancy 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा; 'ही' शेवटची तारीख
Railway Vacancy 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी. त्वरित अर्ज करा. संधी सोडू नका.
Railway Vacancy 2022 : रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Corporation Limited) KRCL ने सहाय्यक प्रकल्प अभियंता आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार (Applicant) 7 फेब्रुवारी 2022 रोजी मुलाखत (Walk-in-Interview) देऊ शकतात.
या भरतीअंतर्गत एकूण 14 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी नोंदणीची (Registration) वेळ फक्त सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत आहे. उमेदवारांना एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, 400706 येथे कळवावे लागेल.
किती पदांसाठी भरती?
सहाय्यक प्रकल्प अभियंता (फॅब्रिकेशन) : 4 जागा
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (फॅब्रिकेशन) : 10 जागा
पात्रता आणि वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार (According to Notification), दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार (Applicant) मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून किमान 55% गुणांसह सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (Bachelor in Civil / Mechanical Engineering) पदवीधर असावेत. सहाय्यक प्रकल्प अभियंता (बांधकाम) (Assistant Project Engineer) साठी वयोमर्यादा 45 वर्षे आहे आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (बांधकाम) (Sr. Technical Assistant) वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
इतर अटी
अधिसूचनेनुसार, पोस्टिंगचे ठिकाण नवी दिल्ली, रायपूर, सूरत, अंबाला, नागपूर आणि इतर कोणत्याही फॅब्रिकेशन हबमध्ये असेल. उमेदवारांनी वैयक्तिकरित्या सादर केलेल्या अर्जांची प्राथमिक छाननी केल्यानंतर, केवळ पात्र उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल. आवश्यक असल्यास उमेदवारांना किमान 2 दिवसांच्या मुक्कामासाठी (स्वत: च्या जबाबदारीवर) यावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : रयत शिक्षण संस्था आणि जिल्हाधिकारी कार्यालय रायगडमध्ये नोकरीची संधी
- Government Jobs : रेल्वेमध्ये बंपर भरती; 'या' पदांवर करु शकता अर्ज
- IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये बंपर भरती; 15 फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम तारिख, त्वरा करा!
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी पाहा फक्त एबीपी माझा लाईव्ह
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI