एक्स्प्लोर

QS Rankings : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज जारी, IIT Bombay देशात सर्वोत्तम तर IIT Delhi दुसऱ्या क्रमांकावर

QS Rankings : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज सस्टेनेबिलिटी 2023 नुसार IIT Bombay ही भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे. IIT बॉम्बे पहिल्या, त्यानंतर IIT दिल्ली आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

QS Rankings : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्ज सस्टेनेबिलिटी 2023 चा (QS World University Rankings: Sustainability 2023) नवा अहवाल जारी झाला आहे. यानुसार आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) ही भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहे. लंडनमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत रोजगारक्षमता, सामाजिक चिंता आणि पर्यावरणातील उत्कृष्टतेसाठी IIT बॉम्बेला भारतातील सर्वोच्च उच्च शिक्षण संस्था म्हणून मूल्यांकन करण्यात आले.

आयआयटी मुंबई (281-300 रँक) पहिल्या, त्यानंतर आयआयटी दिल्ली (321-340 रँक) आणि दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) तिसऱ्या क्रमांकावर (361-380) आहे. याशिवाय, पदवीधरांच्या रोजगारक्षमतेच्या बाबतीत जगातील टॉप 100 संस्थांमध्ये देखील आयआयटी बॉम्बेचा समावेश झाला आहे.

तर दुसरीकडे आयआयटी दिल्लीला (IIT Delhi) त्याच्या रोजगारक्षमता आणि पर्यावरणासाठी तर जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) ला लिंग समानता आणि इतर असमानता दूर करण्यासाठी क्रमवारीत स्थान देण्यात आले. स्पर्धा आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या बाबतीत दिल्ली विद्यापीठ (Delhi University) भारतात चौथ्या क्रमांकावर आहे.

जेएनयूच्या कुलगुरुंकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभिनंदन
विद्यापीठाच्या क्रमवारीतील कामगिरीने जेएनयूचे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी जेएनयूच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन करते, अशी प्रतिक्रिया जेएनयूच्या कुलगुरु प्राध्यापक संतश्री डी. पंडित यांनी दिली.

या क्रमवारीत, आयआयटी खरगपूरचा (IIT Kharagpur) 551-600 रँक श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. आयआयटी खरगपूरने नियमित संशोधन प्रयत्नांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं आहे. जीवनशैली आणि आरोग्य सुधारण्यासाठी विशेष पुढाकार घेणाऱ्या IIT खरगपूरचं जागतिक स्तरावर कौतुक होत आहे.

जागतिक स्तरावर अमेरिकेतील विद्यापीठांचं वर्चस्व
जागतिक स्तरावर, कॅलिफोर्निया विद्यापीठाला सर्वोच्च विद्यापीठ घोषित करण्यात आलं आहे, त्यानंतर टोरोंटो विद्यापीठ आणि ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. 135 रँकिंग विद्यापीठांसह (एकूण 19.2 टक्के) या क्रमवारीत अमेरिकेचे वर्चस्व आहे. त्यापैकी 30 विद्यापीठांचा टॉप 100 मध्ये समावेश आहे.

त्याचप्रमाणे, क्रमवारीत 67 ब्रिटीश विद्यापीठांच्या समावेशासह यूके दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतील विद्यापीठांचा या क्रमवारीत समावेश आहे.

इतर महत्त्वाची बातमी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget