![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
NEET UG 2022 Answer Key : नीट Answer Key कधी होणार जाहीर? NTA नं केलं जाहीर
NEET Result , Answer Key Date : NEET UG 2022 ची उत्तरपत्रिका (Answer Key) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 7 सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
![NEET UG 2022 Answer Key : नीट Answer Key कधी होणार जाहीर? NTA नं केलं जाहीर NEET UG 2022 Answer Key Date Proposed to Release by August 30 NTA Official Notification NEET UG 2022 Answer Key : नीट Answer Key कधी होणार जाहीर? NTA नं केलं जाहीर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/11/64824285d25b7718f595825f48fe9654_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NEET Result , Answer Key Date : वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या NEET UG परीक्षेचा निकाल 7 सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तर आन्सर की 30 ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. NEET दिलेले विद्यार्थी neet.nta.nic.in वर भेट देऊन आन्सर की आणि निकाल पाहू शकतात. NTA ने नोटीस जारी केली आहे की, NEET उमेदवारांना आन्सर कीवर आक्षेप घेण्याची संधी देखील मिळेल. यासाठी त्यांना प्रति प्रश्न 200 रुपये मोजावे लागतील. याशिवाय, रेकॉर्डेड रिस्पॉन्स चॅलेंज (प्रति प्रश्न 200 रुपये) मिळवण्याचीही संधी असेल.
यावर्षी एकूण 18,72,329 परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी 10.64 लाख विद्यार्थीनी होत्या. देशात राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परीक्षेसाठी (नीट) पहिल्यांदा 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 2021 च्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या संख्येत 2.5 लाखांची वाढ झाली होती. NEET-UG परीक्षा 17 जुलै रोजी देशाबाहेरील 14 शहरांसह एकूण 497 शहरांमधील 3,570 केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती.
NEET Answer Key 2022 : नीट आंसर-की कशी कराल डाऊनलोड?
- नीट आंसर-की जारी केल्यानंतर वेबसाईट neet.nta.nic.in वर भेट द्या.
- NEET answer keys 2022 या आयकॉनवर क्लिक करा.
- आपला अप्लिकेशन नंबर, पासवर्ड इत्यादीनं लॉगइन करा आणि आवश्यक माहिती भरा.
- डिटेल्स भरल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आन्सर की तुमच्यासमोर ओपन होईल.
NEET UG 2022 Answer Key : आक्षेप कसा नोंदवावा?
1. सर्वात आधी उमेदवारांनी nta.nic.in या NEET च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2. त्यानंतर उमेदवारांनी उत्तरपत्रिका या लिंकवर क्लिक करावं.
3. त्यानंतर उमेदवारांनी लॉगिन तपशील टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावं.
4. आता उमेदवारांनी कोणत्या प्रश्नासाठी आक्षेप घ्यायचा आहे ते निवडावं.
5. शेवटी उमेदवारांनी आक्षेप शुल्क भरून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करावं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)