NEET PG 2022 Result : नीट-पीजी परिक्षेचा निकाल जाहीर, आरोग्यमंत्र्यांची माहिती
NEET PG 2022 Result : नीट पीजी परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
NEET PG 2022 Result : नीट पीजी परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. मनसुख मंडाविया यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. परिक्षा देणारे विद्यार्थी अधिकृत natboard.edu.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. भारतातील पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET ही एकमेव प्रवेश परीक्षा आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असणारे तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी परीक्षेला बसतात.
NEET-PG result is out, says Union Health Minister Dr. Mansukh Mandaviya
— ANI (@ANI) June 1, 2022
He congratulates all the students who have qualified for NEET-PG pic.twitter.com/nkqe2wPwIG
यंदा फक्त दहा दिवसांत नीट पीजी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्वीट करत पात्र उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, ''नीट पीजी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्या सर्वांचं अभिनंदन! फक्त दहा दिवसांत निकाल दाहीर केल्याबद्दल @NBEMS_INDIA यांचं अभिनंदन करतो.. निकाल पाहण्यासाठी natboard.edu.in वर भेट द्या.''
NEET UG साठी नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत 'विक्रमी' वाढ
यंदा NEET-UG 2022 साठी रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी 2.57 लाख अधिक नोंदणी झाली असून, हा आकडा 18 लाखांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 12 भारतीय भाषांमध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत 274.3% ची वाढ झाली आहे, तमिळ भाषेत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय यावेळी महिला उमेदवारांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे. यंदा या परीक्षेसाठी 10 लाखांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे.
आणखी वाचा -
- NEET 2022: ...ही तर NEET PG परीक्षार्थींची उघड लूट; FAIMA चा गंभीर आरोप
- NEET UG 2022 Registration : नीट परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची मुदत वाढवली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
- NEET-PG परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका; म्हटले, "हे तर विद्यार्थी हिताच्या विरोधात"
- NEET PG परीक्षा पुढे ढकललेली नाही; बनावट नोटीस व्हायरल झाल्यानंतर NBE चं स्पष्टीकरण
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI