NEET PG परीक्षा पुढे ढकललेली नाही; बनावट नोटीस व्हायरल झाल्यानंतर NBE चं स्पष्टीकरण
NEET PG Exam 2022 : NEET PG परीक्षा पुढे ढकलल्याची बनावट नोटीस व्हायरल झाली असून परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार असल्याचं स्पष्टीकरण NBE नं दिलं आहे.
NEET PG 2022 : सध्या सोशल मीडियावर NEET परीक्षा (NEET Exam) पुढे ढकलल्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. नीट परीक्षेसंदर्भात व्हायरल होणाऱ्या एका पत्रामुळे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच NBE नं सोशल मीडियावर व्हायरल होणारं पत्र खोटं असून परीक्षा ठरलेल्या तारखेलाच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्यानं केली जात आहे. अशातच नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसनं (NBEMS Feke Notice) नोटीस जारी करत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट नोटीसबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
NBEMS ने नोटीसमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रीय परीक्षा बोर्ड (NBE) संदर्भात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत एक बनावट नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. NBEMS च्या नावानं खोट्या नोटिशीचा वापर करून खोटी आणि बोगस माहिती व्हायरल केली जात असल्याचं NBEMS च्या निदर्शनास आलं आहे. नीट पीजी (NEET PG 2022 postpone) परीक्षा पुढे ढकलल्याची खोटी माहिती समोर आल्यानंतर NBE ने स्पष्टीकरण जारी केलं आहे.
एनबीआयकडून हेल्पलाईन क्रमांक जारी
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) इन मेडिकल सायन्सेसनं म्हटलं आहे की, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन natboard.edu.in वरील अधिकृत वेबसाईटवरच त्याच्या क्रियाकलापांशी संबंधित सूचना जारी करते. विद्यार्थ्यांना NBEMS (NEET PG 2022 पुढे ढकलणं) संबंधित कोणतीही माहिती फक्त वेबसाइटवर तपासण्याचं आम्ही आवाहन करतो. NBE नं म्हटलं आहे की, अशा बनावट नोटिसांवर विश्वास ठेवू नका आणि अशा कोणत्याही नोटीसनं दिशाभूल करू नका. NBEMS बद्दलची कोणतीही माहिती त्यांच्या वेबसाइटवरून तपासल्यानंतरच विश्वास ठेवा.
कोणत्याही प्रश्नासाठी, NBEMS उमेदवार केअर सपोर्टशी 011-45593000 वर संपर्क साधा किंवा NBEMS च्या कम्युनिकेशन वेब पोर्टल exam.natboard.edu.in/communication ला भेट देऊन अपडेट करा. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फेक नोटीसमध्ये NEET PG परीक्षा 9 जुलै 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग अजूनही 5,000 इंटर्नची अपात्रता आणि अपर्याप्ततेचे कारण देत NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहे. ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन (AIMSA) ने देखील अलिकडेच NEET PG 2022 ला पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI