Nanasaheb Thorat : मराठमोळ्या शास्त्रज्ञाला आयर्लंड सरकार आणि युरोपियन कमीशनकडून कॅन्सरवरील संशोधनासाठी 8 कोटींचा निधी
Nanasaheb Thorat : मराठमोळे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांना आयर्लंड सरकार आणि युरोपियन कमीशन यांच्याकडून कॅन्सर वरील संशोधनासाठी 8 कोटी रुपयांचा निधी
Nanasaheb Thorat : संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या कॅन्सर या आजारावरती संशोधन करून नावीन्यपूर्वक उपचारपद्धती शोधण्यासाठी मराठमोळे शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांना आयर्लंड सरकार आणि युरोपियन कमिशन यांनी एकत्रितपणे दहा लाख युरोंचा म्हणजेच आठ कोटी रुपयांचा संशोधन निधी जाहीर केला आहे. आयर्लंड सरकारच्या सायन्स फौंडेशन आयर्लंड आणि युरोपियन कमिशनच्या ग्लोबल फेलोशिप प्रोग्रॅम अंतर्गत हा निधी प्राप्त झाला असून यामध्ये डॉ. थोरात यूरोपमध्ये स्वतःची संशोधन टीम स्थापन करणार असून या संशोधन प्रकल्प अंतर्गत डॉ. थोरात यांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील मेडिकल स्कूल मध्येपण संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. जगभरातुन या संशोधन प्रकल्पांसाठी एक हजार पेक्षा अधिक अर्ज आले होते त्यामधून २५ तरुण शास्त्रज्ञांना हा निधी मिळाला असून यामध्ये दोन भारतीयांचा समावेश असून डॉ. थोरात हे एकमेव मराठी शास्त्रज्ञ आहेत.
डॉ. थोरात हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणी या गावचे असून त्यांनी कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातून एमएसस्सी (MSc ) तर प्रोफेसर एस. एच. पवार यांच्या मार्गदर्शनात डी. वाय. पाटील कोल्हापूर येथून सण 2014 मध्ये पीएचडी केली आहे. 12 वर्षांपासून ते कॅन्सर आणि संसर्गजन्य आजार यावरती संशोधन करत आहेत, त्याचे शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, सहा पुस्तके आणि तीन इन्वेंशन्स प्रसिद्ध झाली आहेत. सण 2050 पर्यंत यूरोपमध्ये दोघांमधील एकाला तर आशियायी देशांमध्ये सहामधील एकाला कॅन्सर होण्याची भीती जगातील अनेक शास्त्रज्ञांनी दिली आहे, तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेज मध्ये असणाऱ्या कॅन्सरवरती सध्या कोणतीही उपचार पद्धती फायदेशीर ठरत नसून अशा कॅन्सर रुग्णाचे आयुष्य जास्तीत जास्त 4 ते 5 वर्षे असू शकते. त्याचबरॊबर कॅन्सरवरती शोधल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीचे प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी होतात मात्र त्या मानवी शरीरात अपयशी ठरताना दिसून येतात. या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी डॉ. थोरात यांची संशोधन टीम कॅन्सर रुग्णापासून कॅन्सर पेशी घेऊन प्रयोगशाळेतच आधुनिक तंत्रज्ञान वापरून 3D (त्रिमितीय) कॅन्सर ट्युमर तयार करणार असून त्यावरती नॅनो तंत्रज्ञान वापरून त्या रुग्णाला सध्या दिली जाणारी औषधे कितपत उपयोगी ठरतील याचा अंदाज बांधता येणार आहे. तसेच हे तंत्रज्ञान वापरून उपचार करूनही भविष्यात कॅन्सर पुन्हा माघारी येईल का? याचा अंदाज बांधणे सुद्धा शक्य होणार आहे.
पहिले भारतीय नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी व्ही रमण यांनी शंभर वर्षांपूर्वी शोधलेल्या "रामन इफेक्ट" याचा सुद्धा उपयोग या संशोधनामध्ये केला जाणार आहे. 100 मधील 40ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या स्त्रियांचा कॅन्सर काही महिन्यात चौथ्या स्टेजमध्ये मेंदूपर्यन्त पसरतो आणि त्यावेळेला त्यावरती उपचार करणे खूपच अवघड होते, अशा आक्रमक कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी नवीन उपचार पद्धती शोधण्याचे कार्य या संशोधन प्रकल्पाअंतर्गत केले जाईल. यामध्ये आयर्लंड मधील युनिव्हर्सिटी ऑफ लिमेरीक, इंग्लंमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ मधील संशोधन प्रयोगशाळेंचा समावेश असेल. याआधीसुद्धा डॉ. थोरात यांना युरोपियन कमिशनने सण ऑक्टोबर २०२० मध्ये स्त्रियांच्यातील ब्रेस्ट कॅन्सरवती केलेल्या सांशोधनासाठी यूरोपमधील सर्वोत्कृष्ट "इनोव्हेशन रडार प्राईझ" तर मार्च २०२१ मध्ये "ब्राईट साईड ऑफ २०२०" पुरस्कार देऊन गौरविले होते. सध्या डॉ. थोरात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये लहान मुलांच्या मेंदूच्या कॅन्सरवरती संशोधनाचे कार्य करीत असून तसेच डॉ थोरात यांनी महाराष्ट्रा यामध्ये कॅन्सर वरती जनजागृती आणि नवीन मराठी तरुण शास्त्रज्ञ तयार करण्यासाठी "कॅन्सर हेल्थ फौंडेशन" या संस्थेची स्थापना केली असून ऑक्टोबर २०२२ पासून ती संस्था महाराष्ट्रा कार्य सुरु करणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI