Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेत एमएमएस, एमसीएसह 17 अभ्यासक्रमास यूजीसीची परवानगी
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल संस्थेत एमएमएस, एमसीएसह 17 अभ्यासक्रमास यूजीसीनं परवानगी दिली असून प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
Mumbai : शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी यूजीसीनं मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या 17 अभ्यासक्रमास परवानगी दिली आहे. यानुसार आयडॉलचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. यावर्षी यूजीसीने आयडॉलच्या एमए भूगोल आणि एमएमएस (एमबीए) या नवीन अभ्यासक्रमास परवानगी दिली आहे. पुढील वर्षी एमए मानसशास्त्र, एमएसडब्ल्यू, पत्रकारिता यांसारखे इतरही अनेक नवीन अभ्यासक्रम आयडॉलमधून सुरु केले जातील, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.
17 अभ्यासक्रमांना परवानगी
कोविडमुळे यूजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या जुलै सत्राची सुरुवात नोव्हेंबर पासून सुरु करण्याचं ठरवलं. यानुसार यूजीसीनं या शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमाच्या मान्यतेची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या 17 अभ्यासक्रमास यूजीसीने परवानगी दिली आहे. मागील वर्षी 15 अभ्यासक्रमास परवानगी देण्यात आली होती.
प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर
पदवी स्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व बीएस्सी संगणकशास्त्र आणि पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी आयटी, एमसीए आणि एमएमएस (एमबीए ) याच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.
एमएमएस (एमबीए ) आणि एमसीए प्रवेश परीक्षा
एमएमएस (एमबीए) आणि एमसीए हे दोन अभ्यासक्रम व्यावसायिक असल्याने याची प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाईल. या दोन्हीही अभ्यासक्रमाला युजीसीबरोबरच एआयसीटीईचीही मान्यता मिळाली आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस (एमबीए) च्या 720 जागा तर एमसीएच्या 2000 जागांना मान्यता दिली आहे. यातील एमसीए हा अभ्यासक्रम यावर्षीपासून दोन वर्षाचा करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ प्रथमच एमएमएस (एमबीए) हा अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून चालविणार आहे. यासाठी आयडॉलला मुंबई विद्यापीठाची बजाज व्यवस्थापन संस्था आणि अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्था शैक्षणिक सहकार्य करीत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI