Maharashtra SSC Result 2024 : विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत...
SSC Result : दहावीचा निकाल काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल प्रथम वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. त्यानंतर शाळांमध्ये त्याची प्रत उपलब्ध होईल.
MSBSHSE SSC Result 2024 मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावीचा निकाल (SSC Result) येत्या तीन दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बारावीचा निकाल जाहीर करताना महत्त्वाची माहिती दिली होती. दीपक केसरकर दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होईल, असं म्हटलं होतं. आता 27 मे ला तीन दिवस बाकी राहिल्यानं दहावीचा निकाल कधी जाहीर होता याबाबत विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रथम निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये छापील प्रत उपलब्ध होते. बोर्डाकडून दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं mahresult.nic.in या वेबसाईटसह (When and Where to Watch SSC Result) अन्य वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना निकाल कुठं पाहायला मिळणार?
1. mahresult.nic.in
2. www.mahahsscboard.in
3. https://results.digilocker.gov.in
4. http://results.targetpublications.org
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वरील वेबसाईटशिवाय अन्य काही वेबसाईटसवर आणि डिजीलॉकरवर निकाल प्रसिद्ध करेल. विद्यार्थी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या वेबसाईटसवर निकाल पाहू शकतात शिवाय तो डाऊनलोड देखील करुन ठेवू शकतात.
दहावीचा निकाल कसा पाहणार?
स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3 तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा
स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा
स्टेप 5: निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या
बारावीचा निकाल जाहीर, दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. दीपक केसरकर यांनी 27 मे पर्यंत दहावीचा निकाल लागेल असं सांगतिल्यानं विद्यार्थ्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. आता आगामी तीन ते चार दिवसात दहावीचा निकाल जाहीर होतो का ते पाहावं लागणार आहे. एकीकडे दहावीचा निकाल काहीच दिवसांमध्ये जाहीर होत असताना अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झालेली आहे. अकरावीच्या प्रवेशाच्या नोंदणी प्रक्रियेतील दुसरा टप्पा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु होईल.
संबंधित बातम्या :
बारावीचा निकाल लागला, दहावीचा निकाल काही दिवसांवर, अकरावी प्रवेशासाठी नोंदणी 'या' दिवशी सुरु
SSC Result : दहावीचा निकाल कधी लागणार? दीपक केसरकरांनी तारीख सांगत दिली मोठी अपडेट
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI