HSC Exam 2023: बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! सराव परीक्षा दिल्याशिवाय यंदा अंतर्गत गुण नाहीच
HSC Exam 2023: 7 डिसेंबर ते 19 जानेवारी या वेळापत्रकानुसार आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा घेतली जात आहे.
HSC Exam 2023: बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान बोर्ड परीक्षा देण्यापूर्वी विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली असून, या माध्यमातून त्यांना अंतर्गत गुणदान केले जाणार आहे. तर 7 डिसेंबर ते 19 जानेवारी या वेळापत्रकानुसार आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा घेतली जात आहे. विशेष म्हणजे हा पॅटर्न औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळांच्या अंतर्गत पाचही जिल्ह्यांत राबविण्यासाठी बोर्डाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.
2019-20 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षा (बोर्ड परीक्षा) घेण्यात आली नव्हती. तर या वर्षातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्यातील या परीक्षेची भीती नाहीशी व्हावी, परीक्षेला सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, लिखाणाचा सराव वाढावा, या हेतूने विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे. या माध्यमातून त्यांना अंतर्गत गुण दिले जाणार आहे.
प्रश्नसंचही तयार...
विशेष म्हणजे या सराव परीक्षेसाठी निवडक कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या गटाने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी प्रश्नसंचही तयार केले आहेत. यासाठी बोर्डाने वेळापत्रकही निश्चित केले असन शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्यांची एक समन्वय समितीही नियुक्त करण्यात आली आहे. तत्पूर्वी 24, 28 आणि 30 नोव्हेंबर रोजी घटक चाचणी घेण्यात आली. तर 7 डिसेंबर ते 19 जानेवारी या वेळापत्रकानुसार आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा घेतली जात आहे. दरम्यान आत्तापर्यंत एकूण 58 हजार विद्यार्थ्यांपैकी 56 हजार 700 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
होम सेंटर बंद...
बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान होणार आहे. दरम्यान यावेळी होम सेंटर पद्धत बंद करण्यात आली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने 2021-22 मध्ये होम सेंटरचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावेळी आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने होम सेंटर रद्द करण्यात आले आहे. तसेच पूर्ण 100 टक्के अभ्यासक्रमनुसार परीक्षा होणार आहे. सोबतच या दोन्ही परीक्षेदरम्यान यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे. सोबतच परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या:
SSC-HSC Exam: दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक पूर्णवेळ हजर राहणार; गैरप्रकारांना बसणार आळा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI