कंत्राटी शिक्षक भरती रद्द, आता कमी पटसंख्या असलेल्या शाळांत नियमित शिक्षक येणार, सरकारचा नवा जीआर!
राज्य सरकारने आता नवा जीआर काढला आहे. या जीआरनुसार ज्या शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे, त्या शाळेत डीएड बीएडधारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : राज्य सरकारने शिक्षक भरतीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नुकताच एक शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार आता सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएडधारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने नियमित शिक्षक आता पुन्हा या शाळांना शिकवणार आहेत.
आधीच्या शासन निर्णयात नेमकं काय होतं?
राज्यातील सरकारी शाळा जिथे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या होती, त्या शाळांमध्ये बीएड आणि डीएडधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये शासन निर्णय काढण्यात आला होता. खरंतर नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून सरकारने हा शासन निर्णय जाहीर केला होता.
सरकारचा नवा जीआर नेमका काय आहे?
मात्र आता 2022 सालच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. याच कारणामुळे 2024 च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल असा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा :
'कॅरी ऑन योजनेसाठी' सरकार अनुकूल असणं दुर्दैवी, अभाविपकडून मंत्री चंद्रकांत पाटलांना घरचा आहेर
राज्यात 12 वी परीक्षेला 15,05,037 विद्यार्थी, 271 भरारी पथके; 'कॉपीमुक्ती'ची कडक अंमलबजावणी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

