एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली

भाजपमध्ये बरेच दिवस माझा भाजपप्रवेश पेंडिंग होता, नगरपालिका आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे (Samarjeet) यांचा पुन्हा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळू शकल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा समरजीत घाडगे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. येत्या 8 तारखेला मुंबईतील भाजप (BJP) कार्यालयात त्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा पडणार आहे. यासंदर्भात स्वत: समरजितसिंह घाटगे यांनी माहिती दिली.  

भाजपमध्ये बरेच दिवस माझा भाजपप्रवेश पेंडिंग होता, नगरपालिका आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशननंतर अधिकृत पक्षप्रवेश करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. आता, येत्या आठ तारखेला माझा भाजप प्रवेश होतोय. माझ्या मूळ पक्षात परत आलोय याचं मला समाधान आणि अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया समरजीत घाटगे यांनी दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत, त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केलं आहे. मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळते, याचही समाधान आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यातच मी शरद पवार यांना भेटून माझी भूमिका सांगितली होती. शरद पवार यांना सांगूनच मी ही पुढची पावलं उचलली आहेत, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले. 

कागल नगरपालिकेत मोठा विजय

दरम्यान, नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आले होते. दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याने कागल नगरपरिषदेमधील 23 पैकी 23 जागा घाटगे-मुश्रीफ यांच्या आघाडीने जिंकत व्हाईट वॉश दिला. इतकेच नव्हे तर नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने विजयी झाल्या. त्यामुळे, एकप्रकारे कागलच्या दोन्ही नेत्यांच्या आघाडीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याची चर्चा होती. तर, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असेही घाटगे यांनी यावेळी म्हटले होते. मात्र, मुरगुड नगरपालिकेमध्ये दोघांच्या आघाडीला मोठा झटका बसला. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने यश मिळवताना सत्ता खेचली आहे. 

हेही वाचा

मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
रावसाहेब दानवेंनी आता राज्यपाल व्हावं, आमदार लोणीकरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले मला परभणीतून खासदार व्हायचंय
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget