एक्स्प्लोर

CBSE: मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती, नवीन शिक्षणक्रम जाहीर

CBSE: सीबीएसई बोर्डाचा नवीन शिक्षणक्रम जाहीर करण्यात आला असून नवीन शिक्षण क्रमानुसार इयत्ता सहावीपासून तीन भाषा विषय आणि इयत्ता नववी पासून गणित आणि विज्ञानाचे द्विस्तरीय रचनेचा अवलंब केला आहे.

CBSE : सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये आता सहावीपासून तीन भाषांची सक्ती (Three Languauge Mandatory) करण्यात आली आहे. सीबीएसई बोर्डाचा नवीन शिक्षणक्रम जाहीर करण्यात आला असून नवीन शिक्षण क्रमानुसार सीबीएसई बोर्डाने इयत्ता सहावी पासून तीन भाषा विषय आणि इयत्ता नववी पासून गणित आणि विज्ञानाचे द्विस्तरीय रचनेचा अवलंब केला आहे. सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावी वर्गापासून पुढील वर्षी शिकवल्या जाणाऱ्या तीन पैकी दोन भारतीय भाषा असतील. सोबतच तिसरी भाषा 42 भाषांपैकी एक भाषा ही विद्यार्थ्यांनी तिसरी भाषा निवडायची आहे. (CBSE To Get Three Languauge Mandatory)

सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकाव्या लागतील (Three Languauge Mandatory)

दरम्यान, येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकाव्या लागतील तर परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन भाषांच्या अटीतून सूट असेल त्यासोबतच मंडळाने पुढील वर्षीपासून गणित आणि विज्ञानासाठी नेहमीच्या ऐंशी गुणांच्या परीक्षा व्यतिरिक्त आणखी एक पर्याय दिला आहे. ही परीक्षा 25 गुणांची असून त्यात संबंधित विषयाची आकलन क्षमता कसोशीने तपासली जाणार आहे. यातील गुण एकूण गुन्ह्यांमध्ये समाविष्ट न करता त्याची गुणपत्रिकेवर वेगळी नोंद करण्यात येईल, अशी देखील माहिती आहे.

CBSE : विद्यार्थ्यांसाठी काय बदलणार आहे?

आतापर्यंत, बहुतेक शाळांमध्ये केवळ दोन भाषा अनिवार्य विषय म्हणून होत्या. नवीन धोरणानुसार, विद्यार्थ्यांना एक अतिरिक्त भाषा शिकणे आवश्यक असेल. यामुळे त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती वाढेल, तसेच विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकण्याची आणि समजून घेण्याची संधीही मिळेल. सीबीएसईचा विश्वास आहे की, यामुळे मुलांच्या विचारशक्तीचा विकास होईल आणि विविध भाषा व संस्कृतींबद्दलची त्यांची समज वाढेल.

CBSE Three Languauge :  तिसऱ्या भाषेला अधिक वेळ का दिला जात आहे?

नवीन पद्धतीनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वी हा मधला टप्पा मानला जातो. या काळात तिसऱ्या भाषेचा अभ्यास सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना ती शिकण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. सीबीएसईच्या मते, अनेक विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा पूर्णपणे नवीन असू शकते. त्यामुळे, ती समजून घेण्यासाठी, बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी सराव आणि वेळ आवश्यक आहे.

भाषा संस्कृती आणि अस्मितेला जोडेल

अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, भाषा केवळ अभ्यासाचा विषय नाही, तर संस्कृती आणि समाजाशी जोडले जाण्याचे एक साधन देखील आहे. भारतात अनेक समृद्ध भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. जेव्हा विद्यार्थी एकापेक्षा जास्त भारतीय भाषा शिकतील, तेव्हा त्यांना देशाची विविधता अधिक चांगल्या प्रकारे समजेल. यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना देखील दृढ होईल.

हे सुद्धा वाचा -

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget