'कॅरी ऑन योजनेसाठी' सरकार अनुकूल असणं दुर्दैवी, अभाविपकडून मंत्री चंद्रकांत पाटलांना घरचा आहेर
गुणवत्तेसाठी मारक असणाऱ्या 'कॅरी ऑन योजनेसाठी' राज्य सरकार अनुकूल असणं दुर्दैवी असल्याचे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) व्यक्त केलं आहे. या

Chandrakant Patil : गुणवत्तेसाठी मारक असणाऱ्या 'कॅरी ऑन योजनेसाठी' राज्य सरकार अनुकूल असणं दुर्दैवी असल्याचे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) व्यक्त केलं आहे. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं परिपत्रक काढत एकेकाळी अविभात काम करणारे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना घरचा आहेर दिला आहे. अभाविपच्या कोकण प्रदेशाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
गेल्या 2 दिवसापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात अकृषी विद्यापीठंच्या कुलगुरुंची ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी 'कॅरी ऑन योजना' लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन, विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षेची संदी देण्यासाठी विद्यापीठ पातळीवर एकसमानता ठेवावी अशी सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मंत्री चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर दिला आहे.
कॅरी ऑन योजना कशी ठरते उपयुक्त?
काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अडचणी येतात. अशा विद्यार्थ्यांसाठी ‘कॅरी ऑन योजना’ उपयुक्त ठरते. ही योजना विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करत त्यांच्या शैक्षणिक वर्षाची हानी टाळण्यासाठी महत्त्वाची ठरते. मात्र सध्या विविध विद्यापीठांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीबाबत एकसमानता नसल्याचे दिसते. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व विद्यापीठांनी कालबद्ध नियोजन करून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुचवले होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये व त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी या योजनेच्या माध्यमातून त्यांना परीक्षा देण्यासाठी पुन्हा संधी देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले होते. ‘कॅरी ऑन योजना’ लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांना अपयशानंतरही आपले शिक्षण सुरू ठेवता येते व पुढील परीक्षेसाठी तयारी करता येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो व शैक्षणिक नुकसान कमी होते असे पाटील म्हणाले होते.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

