जॉब माझा : भारतीय नौदल, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?
नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी भारतीय नौदल, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेत काम करण्यासाठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे कराल.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
भारतीय नौदल, VSSC विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती निघाली आहे. या नोकरीसाठी पात्रता काय आहे, अर्ज कुठे कराल, शेवटची तारीख कधी या सर्वांची माहिती घेऊयात.
भारतीय नौदलात दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे
एकूण जागा : 33
पदाचे नाव : सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत)
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त उमेदवाराला संगीत विषयाचे चांगले ज्ञान असणे आणि सोबतच वाद्य वाजवता यायला हवे.
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा 1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यानचा असणे गरजेचे आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 ऑगस्ट 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
VSSC विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्रात विविध पदांच्या जागांसाठी भरती
पदाचे नाव : केमिकल,ऑटोमोबाईल , संगणक अभियांत्रिकी
जागा : 158
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदविका (संबंधित शाखेत).
वयोमर्यादा : 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑगस्ट 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.vssc.gov.in सविस्तर माहिती मिळू शकेल
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव : वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक
एकूण जागा : 01
शैक्षणिक पात्रता :
1. कोणत्याही शाखेचा पदवीधर
2. मराठी ३० शब्द प्रती मिनिट टायपिंग आणि इंग्रजी 40 शब्द प्रती मिनिट टायपिंग सोवत संगणकप्रणाली संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (MS-CIT)
3. दुचाकी वाहनचालक परवाना (पक्का) आणि दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक
दुसरी पोस्ट
क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता
एकूण जागा : 03
शैक्षणिक पात्रता :
1. सरकारमान्य MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण
2. संगणकप्रणाली संबंधीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण (कमीत कमी 2 महिने)
नोकरी ठिकाण : मिरा-भाईंदर, ठाणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीची तारीख : 3 ऑगस्ट 2021 आहे.
मुलाखतीचे ठिकाण : मीरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, दुसरा मजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.).
अधिकृत संकेतस्थळ : www.mbmc.gov.in
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- जॉब माझा : IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे नोकरीची संधी; अटी काय, अर्ज कसा कराल?
- TCS Recruitment | कोरोना काळात आनंदाची बातमी; टिसीएस कंपनी 40 हजार फ्रेशर्सला देणार नोकरी
- Oil India Recruitment 2021 : ज्युनियर असिस्टंटच्या 120 पदांसाठी भरती, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI