जॉब माझा : IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे नोकरीची संधी; अटी काय, अर्ज कसा कराल?
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे याठिकाणी विविध पदांच्या 156 जागांसाठी भरती होत आहे. तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2021 आहे.
मुंबई : देशासह राज्यात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण, इतर कोर्स केलेत मात्र नोकरी नाही अशी अनेकांची स्थिती आहे. मात्र अनेकदा असं होतं की, नोकरी असते मात्र ती आपल्याला माहित नसते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती देणे सुरु केले. जेणेकरुन तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे याठिकाणी विविध पदांच्या 156 जागांसाठी भरती होत आहे. तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2021 आहे. याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
पहिली पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-I
- एकूण जागा – 33
- शैक्षणिक पात्रता - 60 टक्के गुणांसह B.E./B.Tech किंवा 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी.
दुसरी पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-II
- एकूण जागा - 37
- शैक्षणिक पात्रता - M.E/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल / मेकेनिकल / सिव्हिल / एनर्जी) किंवा Ph.D किंवा 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी/M.E/M.Tech, तीन वर्षांचा अनुभव.
तिसरी पोस्ट - प्रोजेक्ट सायंटिस्ट-III
- एकूण जागा – 17
- शैक्षणिक पात्रता - M.Sc.Tech / M.Tech (संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / गणित / उपयोजित गणित) किंवा वातावरणीय विज्ञान / हवामानशास्त्र / समुद्रशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / भू-भौतिकशास्त्र / गणित या विषयातील डॉक्टरेट पदवी किंवा 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा M.E/M.Tech, 7 वर्षांचा अनुभव.
चौथी पोस्ट- प्रोजेक्ट असोसिएट-I
- एकूण जागा – 13
शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी
पाचवी पोस्ट - प्रोजेक्ट असोसिएट-II
- एकूण जागा – 10
- शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech किंवा पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव
- सर्व पोस्टसाठी वयोमर्यादा – 19 ते 45 वर्ष.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 1 ऑगस्ट 2021.
यामध्ये आणखीनही पोस्ट आहेत. त्यासंदर्भातली माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईट - www.tropmet.res.in या वेबसाईटवर गेल्यावर latest news मध्ये Recruitment for the various contractual positions at IITM वर क्लिक करा. More information वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI