Job Majha : सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईनमध्ये नोकरीची संधी, 18 जागांची निघाली भरती
Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट (CMPDI) ही कोल इंडियाची उपकंपनी आहे. यात विविध पदांच्या १९८ जागांसाठी भरती होत आहे. सर्वाधिक जागा असणाऱ्या पोस्टविषयीची माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - असिस्टंट ड्रिलर
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा
एकूण जागा – ६१
पोस्ट – रिग्मन
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल / ऑटोमोबाईल ट्रेडमध्ये ITI सह १०वी पास.
एकूण जागा – ५६
पोस्ट – चालक
शैक्षणिक पात्रता - आठवी पास, जड वाहनाचं ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
एकूण जागा – ३७
पोस्ट – सर्वेक्षक
शैक्षणिक पात्रता - DGMS द्वारे जारी केलेल्या सर्वेक्षण प्रमाणपत्रासह १०वी उत्तीर्ण.
एकूण जागा – १३
पोस्ट - सहाय्यक फोरमन
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा – ७
पोस्ट – लिपिक
शैक्षणिक पात्रता – १०वी पास
एकूण जागा – ७
पोस्ट - पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमासह १०वी उत्तीर्ण
एकूण जागा -५
पोस्ट – कनिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – १०वी पास
एकूण जागा – ५
तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२२
तपशील - www.cmpdi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या कॉलममधल्या recruitment वर क्लिक करा. Departmental selection मध्ये २४ फेब्रुवारीच्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI