HSC Exam Result 2025: कोकणची पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश, मुंबईचा निकाल 92.93 टक्के
HSC Exam Result 2025: बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के. बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. तर कोकण विभागाने अव्वल कामगिरीची लौकिक कायम राखला आहे.

HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result 2025) सोमवारी जाहीर झाला. शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानुसार यंदाच्या बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या जास्त आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5 टक्क्यांनी अधिक आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, कोकण या नऊ विभागांमधून 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी 91.88 टक्के इतकी आहे. खासगी विद्यार्थी एकूण 36,133 इतकी होती, त्यापैकी 35,697 जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाली. 17 नंबर टक्केवारी 73.73 टक्के इतकी आहे. तर पुर्नपरीक्षा अर्थात 42024 रिपीटर्स विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यापैकी 15823 रिपीटर्स विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्स विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी 37.65 टक्के इतकी आहे.
याशिवाय, यंदा बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) 7258 दिव्यांग विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6705 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागवार निकालाचा विचार करायचा झाल्यास कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.74 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूरमधून फक्त 89.74 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे एकेकाळी शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेला लातूर पॅटर्न फेल ठरला आहे.
कोकणातील मुलांची मारली बाजी, सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण
विज्ञान- ९७.३५
कला- ८०.५२
वाणिज्य- ९२.६८
व्यवसाय अभ्यासक्रम- ८३.०३
आयटीआय- ८२.०३
बारावीच्या परीक्षेत (HSC Exam) कोणत्या विभागाची बाजी
पुणे -९१.३२
नागपूर- ९०.५२
संभाजीनगर-९२.२४
मुंबई-९२.९३
कोल्हापूर- ९३.६४
अमरावती-९१.४३
नाशिक- ९१.३१
लातूर-८९.४६
कोकण- ९६.७४
बारावीचा ऑनलाईन निकाल(HSC Exam Result Online) कधी पाहता येणार?
दुपारी 1 वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाची ऑफिशिअल वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, उद्यापासून (6 मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे पहिलं नाव आवश्यक असेल. निकालानंतर काही आठवड्यांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. तर जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये पुरवणी परीक्षा आयोजित केली जाईल, आणि त्याचा निकाल सप्टेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.88 टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी
बारावीच्या निकालासंबंधीत 5 प्रश्नांची उत्तरे; रिझल्टची सगळी माहिती वाचा एका क्लिकवर....
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























