Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी
Jaya Kishori On Abp Majha Mahakatta : 'जेव्हा तुम्ही मनातून खुश असता, तुमचे हेतू चांगले असतात तेव्हा तुम्ही काहीच न करता आपसूकच तुमच्या आजूबाजूच्या लोकांना खुश करता.' आपल्या सकारात्मक ऊर्जेने लोकांना भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या प्रवचनकार जया किशोरी (Jaya Kishori) आज एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) आल्या होत्या. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर स्पष्टपणे मत मांडलं आहे.
वयाच्या 7-8 व्या वर्षीच निवडला भक्तीचा मार्ग...
मी माझ्या वयाच्या आधीच समजूतदार झाले. कारण मी वयाच्या 7-8 वर्षी काम करायला सुरुवात केली. मग ते भजन गाणं असो. वयाच्या बाराव्या वर्षी मी पहिली कथा केली. हे सगळं आपसूकच घडत होतं. यामध्ये मी काहीच असं ठरवलं नव्हतं. त्यात माझ्या कुटुंबातून हा मार्ग कोणीच निवडला नाहीये. लोक मला भजन, कीर्तन गायला बोलवायचे आणि मी जायचे. पण, मला पहिल्या दिवसापासून देवाच्या गोष्टी, शास्त्रांचा अभ्यास करायला फार आवडत होतं. पण माझ्या घरचं वातावरणही तसंच धार्मिक आहे. याच गोष्टी करता करता मला आनंद यायचा असं प्रवचनकार जया किशोरी यांनी सांगितलं.
पण जेव्हा मी 14-15 व्या वर्षी कथावाचनाला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की लोक तुम्हाला देवाच्या स्थानी तुम्हाला ठेवतायत. तेव्हा मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारलं की मी खरंच काही सिरीअस काम करतेय का. तेव्हा वडिलांनी मला या क्षेत्रातील सगळे चढ-उतार सांगितले आणि मग मी हाच मार्ग निवडला.
All Shows

































