Maharashtra Board HSC Results 2025: बारावीचा निकाल काही तासांवर; बोर्डाच्या वेबसाईटशिवाय निकाल आणखी कुठे पाहता येणार?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
HSC Results 2025 : बारावीचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra Board HSC Result 2025) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे

Maharashtra HSC Result 2025: राज्याचा बारावीचा निकाल उद्या, 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अधिकृत माहिती दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 मेपासून त्यांच्या महाविद्यालयांतून मार्कशीट वितरित केली जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 10वी आणि 12वीची परीक्षा फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत घेतली होती. आता या परीक्षेच्या निकालाबाबत अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्याचा 12वीचा निकाल उद्या, 5 मे रोजी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेद्वारे जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर त्यांचे मार्कशीट पाहू व डाउनलोड करू शकतील.
निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाइट्स उपलब्ध आहेत:
बोर्डाच्या वेबसाइटशिवाय निकाल कुठे पाहता येईल?
निकाल कसा पाहायचा?
-
सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा – mahresult.nic.in
-
होमपेजवर HSC लिंकवर क्लिक करा
-
तुमचा परीक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
-
तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो जतन करा आणि प्रिंट काढा
दरम्यान, 2025 मध्ये एकूण 15,13,909 विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेस बसले होते. ही परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यातील 3,373 परीक्षा केंद्रांवर पार पडली होती.
10वीचा निकाल (Maharashtra SSC Exam Result) ची प्रतीक्षा
10वीच्या निकालाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. 10वीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच 15 मेपूर्वी घोषित होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाच्या तारखेवर आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
Other important news
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























