Devendra Fadnavis on Hindi: हिंदी भाषा का शिकली पाहिजे, मराठी शाळांमध्ये सक्ती का? देवेंद्र फडणवीसांनी शैक्षणिक धोरणाचं कारण उलगडून सांगितलं
Hindi in Education Policy: पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती, स्पष्ट शब्दात सांगतो, आम्ही खपवून घेणार नाही; राज ठाकरेंचा इशारा. देवेंद्र फडणवीसांकडून धोरणांचे समर्थन.

मुंबई: राज्यात यंदाच्या वर्षापासून लागू करण्यात येत असलेले शैक्षणिक धोरण हे नवे नाही. ते यापूर्वीच निश्चित झाले होते. यासंदर्भात कोणताही नवा शासन आदेश लागू झालेला नाही. शैक्षणिक धोरणानुसार (Education Policy) शाळांमध्ये करण्यात आलेली हिंदी भाषेची (Hindi Language) सक्तीचा निर्णय हा व्यापक दृष्टीकोनातून घेतला असावा, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मांडले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नव्या शैक्षणिक धोरणाबाबत सविस्तरपणे भूमिका मांडली.
राज्यात प्रत्येकाला मराठी आली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. त्यासोबत देशाची भाषाही बोलता आली पाहिजे. केंद्र सरकारने जो विचार केला, देशात एक संपर्क भाषा असली पाहिजे, त्यादृष्टीने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय झाला. महाराष्ट्रात मराठी ही अनिवार्य असेल. मात्र, बाकीच्या भाषाही शिकू शकतात. देशात संपर्कसूत्र हिंदी भाषा आहे, त्यामुळे हिंदी लोकांनी शिकली पाहिजे. कोणाला इंग्रजी आणि अन्य भाषा शिकायची असेल तर मनाई नाही. हिंदी भाषा ही देशातील संपर्कसूत्र आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होईल. जूनपासून या धोरणाची अंमलबजावणी होईल. त्यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या (English Medium) शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा (Hindi Lagunage) शिकवली जाईल. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार असतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. तर पुढील वर्षी दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी इयत्तेसाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येईल. 2028-29 पर्यंत राज्यात बारावीपर्यंत सर्व इयत्तांसाठी नवे शिक्षण धोरण लागू होईल.
मेट्रो 7अ चा बोगदा इंजिनिअरिंग मार्व्हल: देवेंद्र फडणवीस
मेट्रो 7 अ मार्गिकेचे जे काम सुरु आहे, ते इंजिनिअरिंग मार्व्हल आहे. पहिल्यांदाच अपग्रेड मेट्रो ही अंडरग्राऊंड मेट्रोला मिळणार आहे. ज्याठिकाणी आज बोगदा खोदून पूर्ण झाला त्याठिकाणी एलिव्हेटेड आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा संगम होतो. या भागातील मेट्रो स्थानके उभारणे आव्हानात्मक होते. अत्यंत कठीण परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यात आले. एमएमआरडीएच्या माध्यमातून जयकुमार कंपनीने हे काम केले. तेच काम बघायला मी आलो होतो. मेट्रोचे काम अत्यंत वेगाने होत आहे. पुढील वर्षीपर्यंत 150 किलोमीटर मेट्रो मार्ग तयार होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























