Dada Bhuse : विद्यार्थी जी मागणी करतील, ती तिसरी भाषा देऊ; शिक्षणमंत्री दादा भूसेंचे त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण
Dada Bhuse on Third Language Compulsory : राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरून, तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिलं जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती.

Dada Bhuse on Third Language Compulsory : राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यावरून, तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य दिलं जाईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र, यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्टता दिली आहे. दादा भुसे यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, "पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा निवडण्याचा पूर्ण स्वातंत्र्य असेल. ते आपल्या इच्छेनुसार कोणतीही तिसरी भाषा शिकू शकतात." या निर्णयाबाबत राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिले असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
दादा भुसे म्हणाले की, माझी आपल्याला विनंती आहे की, नवीन शासन निर्णय आला, त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे पहिली गोष्ट सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे. इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील तिथे मराठी बंधनकारक आहे. इयत्ता पाचवी पासून गेल्या काही वर्षात हिंदी हा विषय आहे. काही भाषिक शाळा आहे, त्यांची भाषा मराठी आणि तिसरी भाषा हिंदी काही वर्षांपासून शिकवली जात आहे.
किमान 20 विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर...
पहिली ते पाचवी जे विद्यार्थी इच्छुक असतील, त्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय केला गेलाय. असं कळतंय की त्रिभाषा सूत्र अवलंबणार महाराष्ट्र राज्य हे पहिलंच राज्य आहे? बाकीच्या ठिकाणी फक्त चर्चा आणि विरोध आहे. अनेक ठिकाणी हिंदीचा वापर केला जातो. तिसऱ्या भाषेच्या संदर्भात जे मागणी करतील, त्यांना शिकवलं जाणार आहे. मात्र, किमान २० विद्यार्थ्यांची इतर भाषेची मागणी असेल तर शिक्षक उपलब्ध करुन दिला जाईल. ती भाषा शिकवण्यासाठी इतर सुविधा दिल्या जातील किंवा निर्माण केल्या जातील.
तिसऱ्या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडलाय
मराठी शिकवणं सुरु केलं नाही तर शाळांच्या मान्यता देखील रद्द केल्या जातील. गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जातंय. मराठी ही भाषा होतीच, इंग्रजी आणि तिसरी भाषा आहे. इंग्रजीचे धोरण आपण आधीच स्वीकारले आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. त्यात काय नवीन नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये, यासाठी त्रिभाषेचा अवलंब केलाय. आपण तिसऱ्या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडला आहे. शास्त्र असं बोलतं की, लहान मुलांची ग्रास्पिंग पावर जास्त असेल. लहान मुलांचे शिक्षण घेणं मोठ्या प्रमाणात आहे. लहानपणापासून विद्यार्थ्याला भविष्याचे गुणांकन होणार आहे. विद्यार्थी मेरीटमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आपण त्रिभाषा सूत्री करतोय, अशी माहिती त्यांनी दिली.
जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल, ती भाषा आम्ही देऊ
दादा भुसे पुढे म्हणाले की, भारतीय भाषेत जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल, ती भाषा आम्ही देऊ. विद्यार्थी जी मागणी करतील, पालकांना जे सोयीचे वाटेल ती तिसरी भाषा देऊ. अनेक लोकांशी संवाद झाले, चर्चा झाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेरीटमध्ये पुढे आले पाहिजे. संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, हाच हेतू आहे. आम्ही मराठी बंधनकारक करतोय, महाराजांचा इतिहास शिकवला जाणार आहे. गर्जा महाराष्ट्र माझा शिकवणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























