एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तंबी दिल्यानंतरही बंटी शेळकेंकडून आरोपांच्या फैरी; नाना पटोलेंकडून मुस्लिम नेत्यांना लाखोंची ऑफर 

Bunty Shelke : नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर काम करतात. ते संघाचे एजंट आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करा अशी मागणी काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी केलीय.

Bunty Shelke नागपूर : विधानसभा निवडणूकमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत द्वंद्व सुरु झाले आहे का? आणि पक्षातील नाना पटोले (Nana Patole) विरोधी गटाने त्यासाठी नागपूर मध्य मतदारसंघातील पराभूत काँग्रेस उमेदवार बंटी शेळके (Bunty Shelke)  यांना आपले मोहरा बनविला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे कारण म्हणजे नाना पटोले हे आरएसएसचे एजंट आहेत, असा गंभीर आरोप केल्यानंतर बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मध्य नागपुर विधानसभा क्षेत्रात आरएसएसचे मुख्यालय असल्याने नाना पटोले यांनी तिथे काँग्रेस पराभूत व्हावी यासाठी कट रचल्याचा थेट आरोप बंटी शेळके यांनी केलाच आहे. एवढेच नाही तर मध्य नागपूर ची लढत भाजपसाठी सोपी करण्याच्या उद्दिष्टाने नाना पटोले यांनी स्थानिक भाजप उमेदवारसोबत मिळून काँग्रेसच्या काही स्थानिक मुस्लिम नेत्यांना लाखो रुपयांची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप ही बंटी शेळके यांनी केला आहे. त्यामुळे बंटी शेळकेंच्या माध्यमातून काँग्रेस मधील नाना पटोले विरोधी गट आता विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाबद्दल नाना पटोलेंना जबाबदार ठरवून हल्लाबोल करत असल्याचे ही चित्र आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आरएसएसचे एजंट- बंटी शेळके

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही. ते आर एस एस चे एजंट आहेत. नाना पटोले यांनी संघाचे मुख्यालय असलेली मध्य नागपूरची जागा भाजपला सोपी करण्यासाठी कट रचला होता. त्यासाठी ते स्थानिक भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. नाना पटोले यांनी मध्य नागपुरात निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही मदत केली नाही. असे गंभीर आरोप मध्य नागपूर मधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी केले आहे. नाना पटोले हे आरएसएस चे एजंट असल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर बंटी शेळके यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस मिळाली. त्याला उत्तर दिल्याचा दावा करत बंटी शेळके पुन्हा प्रसार माध्यमांसमोर आले आणि नाना पटोले विरोधात आरोपांची मालिकाच लावली.

उमेदवार म्हणून मला काँग्रेस पक्षाकडून कुठलीही ताकद नाही

कारणे दाखवा नोटिसीला मी उत्तर दिलं आहे. मात्र, नाना पटोले यांना मी जो जाब विचारला होता, त्याचे उत्तर मला मिळालेले नाही, असे बंटी शेळके म्हणाले. एवढेच नाही तर मागील विधानसभा निवडणुकीत फक्त चार हजार मतानी माझा पराभव झाल्यानंतर ही यंदा नाना पटोले यांनी मध्य नागपुरातून उमेदवारीसाठी माझे नाव पाठवले नव्हते. उमेदवारी मिळाल्यानंतर ही जेव्हा प्रियंका गांधी माझ्या प्रचारासाठी मध्य नागपुरात आल्या, तेव्हा तिथे नाना पटोले प्रचाराला आले नाही. एक हि सभा माझ्यासाठी घेतली नाही. माझ्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून कुठलीही ताकद उमेदवार म्हणून मला दिली नाही, असा गंभीर आरोप ही शेळके यांनी केला आहे.

नाना पटोले नेहेमीच काँग्रेस कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना ठेवतात

बंटी शेळके यांनी अनेक जुन्या घटना सांगत नाना पटोले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. नाना पटोले यांच्या मतदारसंघातील देवरी बॉर्डरवर आरटीओ विरोधात आंदोलन केलं. तेव्हा नाना पटोले यांनी पाठिंबा दिला नाही. उलट माझ्यावर हल्ला झाला, तेव्हा ही नाना पटोले एकही शब्द बोलले नाही. संघ मुख्यालय समोर आरएसएसचा गणवेश जाळला, त्यावेळेस लोकानी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावर नाना पटोले एकही शब्द बोलले नाही. नाना पटोले नेहेमीच काँग्रेस कार्यकर्त्यांबद्दल द्वेष भावना ठेवतात. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या अपघात प्रकरणातही नाना पाटोले यांच्या खास लोकांनी जोरदारपणे आवाज उठवला नाही. असे म्हणत नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे नाव न घेता बंटी शेळके यांनी निशाणा साधला. 

नाना पटोले हे भाजपच्या हितासाठी काम करतात

एवढेच नाही तर मध्य नागपूरचे भाजप उमेदवार प्रवीण दटके यांनी काँग्रेसचे पदाधिकारी इरफान काजीला बोलावून 20 लाख रु ऑफर केले होते. तेव्हा नाना पटोले यांच्याशी फोन वर इरफान काजी यांचे बोलणं करून देत तुझी उमेदवारी पक्की आहे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे नाना पटोले हे भाजपच्या हितासाठी काम करत असल्याचा बंटी शेळके यांचा आरोप आहे. लवकरच या प्रकरणी आणखी नवे खुलासे करणार असल्याचा दावा ही बंटी शेळके यांनी केला आहे.

श्रेष्ठींपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी नाना पटोले दिल्लीत

दरम्यान, बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्या विरोधात मोहीम उघडी असली, तरी राजकीय दृष्ट्या ते एकटे नाहीत. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील नाना पटोले विरोधी काँग्रेस गट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच नाना पटोले ही पक्ष श्रेष्ठींपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत पोहोचल्याची माहिती आहे. आता बंटीच्या माध्यमातून नानांवर हल्लाबोल करण्याचे हे प्रयत्न काँग्रेमध्ये नव्या वादाचे कारण बनते की, याच्यातून पराभूत झालेल्या काँग्रेसमध्ये खरंच सकारात्मक मंथनाला सुरुवात होऊन काँग्रेसचा काही भले होतं, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावरMarkadwadi Disputes : बॅलेट पेपरवर मतदान, मारकडवाडीत तणाव; 20 जणांना नोटीसTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 2 डिसेंबर 2024  : ABP MajhaSanjay Shirsat PC :  दाढीला हलक्यात घेऊ नका.. संजय शिरसाट यांचा Sanjay Raut यांना थेट इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Raveena Tandon : ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Embed widget