CBSE Results 2021 : मुलाचा बारावीचा निकाल कधी येणार? बोर्डाने 'चेल्लम सरां'चं मिम शेअर करुन दिलं भन्नाट उत्तर
CBSE Results 2021 : आपल्या पाल्याचा बारावीचा निकाल कधी येणार असा प्रश्न अनेक पालकांकडून बोर्डाला विचारण्यात येतोय. त्यावर सीबीएसई बोर्डाने चेल्लम सरांचे मिम शेअर करुन भन्नाट उत्तर दिलंय.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बारावीचा निकाल कधी घोषित करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. आपल्या पाल्याचा बारावीचा निकाल कधी येणार अशी विचारणा अनेक पालकांकडून सीबीएसई बोर्डाकडे करण्यात येतेय. त्यावर सीबीएसईने आता भन्नाट उत्तर देत 'फॅमिली मॅन 2' मधील चेल्लम सरांचे मिम शेअर केलंय.
पालकांना आपल्या मुलांच्या बारावीच्या निकालाची काळजी लागली असून त्यावर सीबीएसईने एक मिम शेअर केलंय. हे मिम फॅमिली मॅन 2 शी संबंधित असून त्यामध्ये मनोज वाजपेयी चेल्लम सरांना कॉल करुन अर्थर्वचा सीबीएसईचा निकाल कधी येणार अशी विचारणा करतो. या निकालावरुन आपण चिंतेत असल्याचं तो सांगतो. त्यावर चेल्लम सर उत्तर देतात, "डोन्ट बी अ मिनिमम पेरेन्ट श्री. आशावादी हो, निवांत रहा, निकाल लवकरच लागेल."
Don't be a Minimum G̶u̶y̶ Parent.#StayCalm #StayHopeful#CBSEResults #CBSE
— CBSE HQ (@cbseindia29) July 28, 2021
cc @BajpayeeManoj @rajndk @Suparn @sharibhashmi @sumank pic.twitter.com/M0WaXGiCib
सीबीएसईने शेअर केलेलं हे मिम आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. सीबीएसईच्या या मिमवर अनेक गमतीशीर कमेंट करण्यात येत आहेत. मुलं बारावीच्या निकालामुळे तणावात असताना सीबीएसई मिम तयार करत असल्याची कमेंट एका यूजरने केली आहे.
Students: Very tensed about when the results will be declared
— Debanko Sinha (@BL00D_C0MMANDER) July 28, 2021
Meanwhile CBSE : Thora meme bana leta hu pic.twitter.com/rG90tRsVOV
Instead of releasing #CBSEClass10 and #CBSEClass12results #CBSE releasing and making memes 😂😂 pic.twitter.com/TEaMSqfBmD
— Prayas Chaurasia(KPC) (@KPC0200207) July 28, 2021
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर झाला आहे. गेल्या महिन्यात, 24 जूनला सर्वोच्च न्यायालयाने सीबीएससी, सीआयसीएसई आणि देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज किंवा उद्या बारावीचा निकाल लागणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra HSC Result 2021 : बारावीचा निकाल उद्या लागणार? निकालाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता
- राज्यातील 'या' 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम, कोणते आहेत हे जिल्हे...
- ABP नेटवर्कवर तेलगू भाषेत जाणून घ्या देश-विदेशातील घडामोडी; लॉन्च झालं 'एबीपी देसम'
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI