Aurangabad: विद्यार्थ्यांवर आली काठीला लटकून नदी ओलांडण्याची वेळ; पुरात गेला पूल वाहून
Aurangabad News: शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाण्याऱ्या विदयार्थीचा जिव घेणा प्रवास सुरू आहे.
Aurangabad: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील चिखलाठाणा गावाला जोडला जाणारा गांधीरी नदीवरील नळकांडी पुल पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे शेतवस्तीवरील चिकलठाणा जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. तर हा पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनधारकांनी केली आहे. तर मोठा पाऊस आल्यास शेतवस्तीवरील नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटून जातो.
कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील गांधीरी नदीवरील नळकांडी पुल वाहुन गेल्याने शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाण्याऱ्या विदयार्थीचा जिव घेणा प्रवास सुरू आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने पालकांमध्ये तिव्र नाराजी दिसुन येत आहे. धरणाचा सांडवा या नदीला येऊन मिळतो, तसेच सांडव्याचा पाण्याचा ओघ वाढला की अश्या समस्यांना तोंड द्यावं लागते.
शेतकऱ्यांनी स्वहखर्चाने बांधला होता पूल...
गंधेश्वर चिखलठाण रस्त्यालगत हा नळकांडी पुल शेतकऱ्यांनी स्वहखर्चाने केला बांधला होता. परंतु नदीला सांडव्याच पाणी वाढल्याने नळकांडी वाहुन गेला. त्यामुळे आता विदयार्थीना शाळेत ये जा करण्यासाठी काठीचा आधार घ्यावा लागत आहे. नदीत पाणी असल्याने विद्यार्थी एका काठीला लटकून इकडून-तिकडे जात आहे. त्यांच्या या जीवघेणा प्रवास एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनीं वेळीच याची दखल घेण्याची गरज आहे.
पुढाऱ्यांच गाव मात्र विकास....
चिखलठाणा हे कन्नड तालुक्यातील गावांमधील महत्वाचे गाव समजले जाते. तर पुढाऱ्यांच गाव अशीही या गावाची ओळख आहे. तालुक्यातील राजकारणात चिखलठाणा गावाचं मोठं वजन आहे. या भागातील मतदारांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी नेहमीच राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. मात्र आज तेच नागरीक अडचणीत असतांना लोकप्रतिनिधी आणि नेतेमंडळी कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: पूल वाहून गेल्याने औरंगाबादच्या कसाबखेडा गावाचा संपर्क तुटला; विद्यार्थ्यांचे हाल
Marathwada: मराठवाड्यातील 207 मंडळात अतिवृष्टी, नुकसान भरपाईपोटी हवे 405 कोटी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI