एक्स्प्लोर
Advertisement
CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी, निकालासंदर्भात आठ महत्वाच्या गोष्टी
CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल आज जाहीर झाला. सीबीएसईचा बारावीचा निकाल 13 जुलै रोजी जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी उत्सुकता होती. सीबीएसई दहावीच्या निकालातील आठ महत्वाचे मुद्दे जाणून घ्या...
नवी दिल्ली : CBSE Class 10 Results 2020 Declared सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बारावीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्यानंतर आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सीबीएसई दहावीच्या निकालातील आठ विशेष मुद्दे
इतके विद्यार्थी झाले पास
CBSE 10वीच्या परीक्षेत यंदा 1885885 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. यातील 1873015 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 1713121 विद्यार्थी पास झाले आहेत.
तिरुवनंतपुरम रिजन अव्वल
यंदा CBSE दहावीच्या निकालात तिरुवनंतपुरम रिजन पहिल्या क्रमांकावर आहे. तिरुवनंतपुरम रिजनचा रिझल्ट 99.28 टक्के लागला आहे. सीबीएसई 12वीच्या निकालात देखील त्रिवेंद्रम रिजन टॉप वर होते.
मुलींची बाजी
सीबीएसई दहावीच्या निकाला यंदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा 3.17 टक्के चांगला निकाल लागला आहे.
मुलामुलींची टक्केवारी अशी
CBSE 10वीच्या निकालात यंदा 93.31 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 90.14 टक्के मुलांनी यश संपादन केलं आहे. सोबतच 78.95 टक्के ट्रांसजेंडर विद्यार्थ्यांनी देखील यश मिळवलं आहे.
केंद्रीय विद्यालयांचा वरचष्मा
CBSE 10वीच्या निकालात केंद्रीय विद्यालयांचा निकाल शानदार आला आहे. केंद्रीय विद्यालयांमधील 99.23 विद्यार्थी पास झाले आहेत.
91.46 टक्के निकाल
यंदा सीबीएसई 10वीच्या परीक्षेच्या निकालात 91.46 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 0.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महाराष्ट्राचा निकाल 98.05 टक्के
CBSE बोर्डाच्या निकाल जाहीर झाला. यात महाराष्ट्राचा निकाल 98.05 टक्के लागला आहे. पुणे विभाग देशात टॉप 5 मध्ये.
बेस्ट ऑफ थ्री नुसार निकाल
आज जाहीर झालेला निकाल हा बेस्ट ऑफ थ्री नुसार जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तीन पेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा दिल्या आहेत, त्या विषयातील सरासरी गुण अन्य न झालेल्या विषयांनाही मिळणार आहेत.
CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, इथं पाहा निकाल
दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सीबीएसईच्या http://cbseresults.nic.in/ या वेबसाईटवर पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या निकालाप्रमाणेच कोणतीही पत्रकार परिषद किंवा गुणवत्ता यादी यावर्षी जाहीर करण्यात आलेली नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल म्हणजेच गुणपत्रिका, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकर किंवा उमंग अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना एसएमएस करुनही आपला निकाल मिळवता येणार आहे. त्यासाठी CBSE10 असं टाईप करुन त्यानंतर एक स्पेस देऊन विद्यार्थ्यांचा रोल नंबर पुन्हा स्पेस हॉल तिकीट आयडी टाईप करुन 7738299899 या क्रमांकावर पाठवला तर विद्यार्थ्यांना लगेच त्याचा दहावीचा निकाल कळू शकेल.
सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेच्या काही विषयांचे पेपर कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होई शकले नव्हते. त्यासाठी सीबीएसई बोर्डाने दोन वेळा परीक्षेचं वेळापत्र जाहीर करुन त्यात बदल करावे लागले. शेवटी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी उर्वरीत विषयाच्या परीक्षा घेणार नसल्याचं जाहीर केलं. अनेक राज्य सरकारांनी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती.
त्यामुळे आज जाहीर झालेला निकाल हा बेस्ट ऑफ थ्री नुसार जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तीन पेक्षा जास्त विषयांच्या परीक्षा दिल्या आहेत, त्या विषयातील सरासरी गुण अन्य न झालेल्या विषयांनाही मिळणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी फक्त तीनच विषयांच्या परीक्षा दिल्या आहेत, त्यातील कोणत्याही दोन विषयातील सर्वाधिक गुणांची सरासरी न दिलेल्या पेपरला लागू असणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी विशेषतः दिल्लीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक किंवा दोनच विषयाचा पेपर झाला आहे, त्यांचा निकाल त्या दोन विषयातील गुण तसंच वर्षभरातील परफॉर्मन्स यानुसार जाहीर केला जाईल.
सीबीएसई 10वी रिझल्ट जाणून घेण्यासाठी स्टेप्स
- सीबीएसई बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईट www.cbseresults.nic.in वर लॉग इन करा.
- होम पेज वर "School Certificate Examination (Class X) Results 2020-" लिंक वर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर जो नवीन रिझल्टचं पेज ओपन झालं आहे, त्यात आपला रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि अॅडमिट कार्ड आयडी टाका. आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
- सबमिट केल्यावर स्क्रिनवर निकाल दिसेल. त्याचे प्रिंटआऊट घ्या किंवा स्क्रिनशॉट घ्या.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement